Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

साताऱ्यातील महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमाची आता राज्यभरात अंमलबजावणी

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या, सरकारी बातम्या
0
Satara Mahil Pathdarshi upakram

मुक्तपीठ टीम

महिला सुरक्षेचा आधुनिक दृष्टिकोनातून विचार करून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून सातारा जिल्ह्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबविण्यात येत आहे. साताऱ्यात या उपक्रमास मिळालेल्या यशामुळे आता हा उपक्रम राज्यभर राबविण्यात येणार आहे. सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली.

साताऱ्यात पोलीस विभागाने या पथदर्शी उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी केल्याने सहा महिन्यांतच या उपक्रमाचे सकारात्मक परिणाम दिसून आले. त्यामुळे हा उपक्रम राज्यभर राबविण्यासाठी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई गेल्या काही दिवसांपासून प्रयत्नरत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या उपक्रमाचे महत्त्व लक्षात घेऊन हा उपक्रम राज्यभर राबविण्यास मान्यता दिली. त्याची घोषणा सादर केलेल्या अर्थसंकल्पात केल्याने आता प्रत्येक जिल्ह्यात हा उपक्रम राबविला जाईल. महिला सुरक्षेच्या दृष्टीने राज्य सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल ठरेल.

satara mahila suraksha pathdarshi -2

साताऱ्यात महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम

महिला सुरक्षेसाठी अभिनव कार्यप्रणाली निर्माण करणारा आणि महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देणारा पथदर्शी उपक्रम गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या पुढाकाराने सातारा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या पथदर्शी उपक्रमाच्या कार्यप्रणालीचे उद्घाटन करण्यात आले होते. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी या उपक्रमाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे  विशेष लक्ष दिले.

तसेच वेळोवेळी आढावा घेऊन पोलीस यंत्रणा आणि संबंधितांना प्रोत्साहन दिले.

सातारा पोलीस दलाने  पथदर्शी उपक्रम जिल्ह्यात प्रभावीपणे राबवला.

महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम आहे तरी कसा?

  • महिलांसाठी असलेल्या कायदेविषयक जागृती, पोलिसी कार्यपद्धतीत सुधारणा आणि सामान्य महिलांना स्वसंरक्षणाचे धडे यावर या उपक्रमात भर देण्यात आला आहे.
  • महिला व बाल अत्याचाराच्या घटनांमध्ये वेगाने तपास करणे
  • आरोपींना तातडीने अटक करणे.
    लवकर आरोपपत्र दाखल करणे.
  • आरोपींना कठोर शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करणे.
  • पीडित महिला व बालकांना शासनाच्या योजनांचा त्वरित लाभ मिळवून देणे.
  • या सर्व उद्दिष्टांसाठी पोलीस विभागाने गंभीरपणे पावले उचलली.
  • त्याचबरोबर या उपक्रमाअंतर्गत महिलांना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासाठीही पोलीस विभागाने नियोजन केले.

साताऱ्यात उपक्रमाला मिळालेले यश

सातारा जिल्ह्यात जिल्हा पोलीस दलाच्या वतीने १६ जुलै २०२१ पासून महिला सुरक्षा पथदर्शी प्रकल्प राबविण्यात येत आहे. आतापर्यंत यातून पाचशेहून अधिक युवतींना स्वसंरक्षणाचे मोफत प्रशिक्षण, तर ३७ हजारांहून अधिक महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून संरक्षण कायदा, २००५ या कायद्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे परिणाम जिल्ह्यात सकारात्मक दिसून आले आहेत.

साताऱ्यात पोलीस विभागाने महिला सुरक्षा पथदर्शी उपक्रम राबवला. सातारा पोलिसांनी घेतलेल्या कष्टामुळे हा उपक्रम यशस्वी झाला असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने तो महत्त्वपूर्ण ठरला आहे. हे ध्यानात घेऊन राज्य सरकारने हा उपक्रम आता राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात राबवण्याचे ठरवले आहे. सातारा पोलिसांनी या पथदर्शी उपक्रमाची उपयुक्तता सिद्ध केल्यामुळेच त्याची व्याप्ती वाढवण्याचे सरकारने ठरवले आहे. त्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली असून त्यासाठी सातारा पोलिसांचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई  यांनी अभिनंदन केले आहे.


Tags: satarashambhuraj desaiगृहराज्यमंत्री शंभूराज देसाईमहिला सुरक्षा पथदर्शी उपक्रमसातारासातारा पोलीस विभाग
Previous Post

महाराष्ट्रातील पहिला आदिवासी औद्योगिक समूह नाशिकच्या दिंडोरीत

Next Post

यूट्यूब आता एक नवीन करिअर पर्याय! कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान!

Next Post
YouTube

यूट्यूब आता एक नवीन करिअर पर्याय! कंटेंट क्रिएटर्सचे जीडीपीमध्ये ६ हजार ८०० कोटींचे योगदान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!