मुक्तपीठ टीम
चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग दहा दिवसांनी बीजिंगमध्ये दिसून आले आहेत. ते एका सरकारी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आले असता सरकारी टीव्हीवर दिसले. अनेक दिवसांपर्यंत दिसून न आल्याने सोशल मीडियावर जिनपिंग यांना चीनच्या सैन्याने नजरकैदेत ठेवल्याच्या अफवा पसरू लागल्या होत्या. त्यामुळे जिनपिंग यांनी सरकारी कार्यक्रमात हजेरी लावत सर्व अफवांना फोल ठरवलं आहे.
एका सरकारी कार्यक्रमात दिसले जिनपिंग!!
- पुढच्या महिन्यात चायना कम्युनिस्ट पार्टी म्हणजेच CPCची वार्षिक मीटिंग होत आहे.
- त्यांच्या अनुपस्थितीमुळे अनेक कयास लावले जात होते.
- शी जिनीपांग यांनी मंगळवारी चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रदर्शनाला भेट दिली आणि सरकारी टीव्हीवर दिसले.
- चिनी राष्ट्रपतींसह या कार्यक्रमात पंतप्रधान ली किकियांग आणि पक्षातील काही नेतेही हजर होते.
- याशिवाय चिनी सैन्याचे काही अधिकारीही येथे दिसून आले.
- या कार्यक्रमात चीनच्या आर्थिक विकासावर चर्चा झाली.
समरकंदमधून परतल्यानंतर दिसले नव्हते जिनपिंग-
- जिनपिंग १६ सप्टेंबरला उझबेकिस्तानच्या समरकंदमध्ये SCO समिटमध्ये सहभागी होण्यासाठी गेले होते.
- ही दोन वर्षांनंतर त्यांची पहिली परदेशी भेट होती.
- समरकंदमध्ये २ दिवस थांबल्यानंतर जिनपिंग बीजिंगला परतले आणि त्यानंतर ते कोणत्याही कार्यक्रमात दिसून आले नव्हते.
- सोशल मीडियावर म्हटले जात होते की, चिनी सेना जिनपिंग यांच्यावर नाराज आहे आणि यामुळेच त्यांना हाऊस अरेस्ट करण्यात आले आहे.
- तसेच, चीनमध्ये कोरोनाच्या काळात हा नियम आहे की, परदेशातून परतल्यानंतर कोणत्याही व्यक्तीला ७ दिवस क्वारंटाइन राहावे लागते.
- सध्या, असा कोणताही नेता नाही जो जिनपिंग यांना थेट आव्हान देत असेल.
- असे म्हटले जात आहे की, ते त्यांच्या मनाला वाटेल तोपर्यंत राष्ट्रपतिपदी राहू शकतात.