Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अखेर ‘पीएफआय’वर बंदी! आता उघड कारवाया बंद!! अधिसूचना जारी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Maharashtra Ats Arrests 20 Pfi Workers

मुक्तपीठ टीम

कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)ला पाच वर्षांसाठी बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आले आहे. पुढील पाच वर्षांसाठी पीएफआयलावर भारतात बंदी घालण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचनाही गृह मंत्रालयाने जारी केली आहे. यूएपीए कायद्यानुसार या संघटनेवर बंदी घालण्यात आली आहे. मागील काही दिवसांत केंद्रीय तपास यंत्रणांनी पीएफआयवर जोरदार कारवाई सुरू केली होती. केंद्र सरकारने पीएफआय शिवाय इतर संघटनांवरही बंदी घातली आहे.

२०१७ मध्ये एनआयएने गृह मंत्रालयाला पत्र लिहून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली होती. एनआयएच्या तपासात ही संघटना हिंसक आणि दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले होते. एनआयएच्या डॉजियरनुसार ही संघटना राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका मानली जात होती.

या संघटनांवर बंदी घातली-

  1. रिहॅब इंडिया फाउंडेशन
  2. कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया
  3. अखिल भारतीय इमाम परिषद
  4. नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ ह्युमन राइट्स ऑर्गनायझेशन
  5. नॅशनल वूमन फ्रन्ट, ज्यूनिअर फ्रन्ट
  6. एम्पॉवर इंडिया फाउंडेशन
  7. रिहॅबन फाउंडेशन (केरळ)
  8. ज्यूनिअर फ्रन्ट

पीएफआयवर पाच वर्षांच्या बंदीनंतर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, बाय-बाय पीएफआय. याशिवाय त्यांनी गृह मंत्रालयाच्या अधिसूचनेची प्रतही शेअर केली आहे.

महाराष्ट्रासह इतर राज्यात छापेमारी

  • मंगळवारी, राष्ट्रीय तपास संस्थेसह (NIA) सुरक्षा यंत्रणांनी पुन्हा दहशतवादी फंडिंग आणि कट्टरपंथी इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)वर कारवाई केली आहे.
  • महाराष्ट्रात १५ जण ताब्यात आहेत. दिल्लीत ३२ आणि गुजरातमध्ये १७ जण ताब्यात आहेत.
  • महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, दिल्ली, आसाम आणि मध्य प्रदेशमध्ये २३० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले.
  • एनआयए आणि पोलिसांच्या पथकांनी मंगळवारी पहाटेपासून पीएफआयच्या आवारात छापे टाकण्यास सुरुवात केली, जी दिवसभर चालली.

Tags: Home Ministry DepartmentIndiaPFIगृह मंत्रालयपीएफआयभारत
Previous Post

शी जिनपिंग परतले! जाहीर कार्यक्रमातील हजेरीनं अफवांना पूर्णविरामाचा प्रयत्न!!

Next Post

दाऊद इब्राहिमशी घनिष्ठ संबंध, खंडणीचा आरोप, गँगस्टर कम पोलीस खबरी रियाझ भाटी जेरबंद!

Next Post
Riyaz Bhati arrested in extortion case

दाऊद इब्राहिमशी घनिष्ठ संबंध, खंडणीचा आरोप, गँगस्टर कम पोलीस खबरी रियाझ भाटी जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!