Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जगातील सर्वात उंच रस्ता भारतात बांधला, BROने १९,३०० फूट उंचीवर इतिहास रचला!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
BRO Tallest road

मुक्तपीठ टीम 

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन म्हणजेच BROच्या प्रयत्नांमुळे जगातील सर्वात उंच वाहनयोग्य रस्ता भारतात बांधण्यात आला आहे. BROने भारताच्या उत्तरेकडील सीमेवरील अत्यंत दुर्गम भागात रस्ते बांधण्याचे कौशल्य उपयोगात आणत हा विक्रम साध्य केला आहे. गेले काही महिने सुरु असलेले काम आताच संपलं आङे. या आठवडय़ाच्या सुरुवातीला ही कामगिरी यशस्वी झाली आहे. बीआरओ ही भारतीय सशस्त्र दलांसाठी रस्ते बांधणी संस्था आहे.

 

जगातील सर्वात उंच रस्ता ज्यावर मोटार वाहने चालवता येतात तो १९ हजार ३०० फूट उंचीवर आहे. पूर्व लडाखमधील उमलिंग ला पास येथे या उंच पर्वतीय खिंडीतून BROने ५२ किमी लांबीचा पक्का रस्ता बनवला आहे. उमलिंग ला पास रस्ता पूर्व लडाखच्या चुमार सेक्टरमधील महत्त्वाच्या शहरांना जोडतो.

 

भारताने कोणाचा विक्रम मोडला?

उमलिंग ला पासने आता बोलिव्हियामधील १८ हजार ९५३ फूट उंचीचा विक्रम मोडला आहे. बोलिव्हियातील शेवटचा सर्वात उंच रस्ता उतुरुंकू नावाच्या ज्वालामुखीला जोडतो.

 

माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा उंच

  • या रस्त्याची खरी स्थिती अशा प्रकारे समजू शकते की तो माउंट एव्हरेस्टच्या बेस कॅम्पपेक्षा उंच आहे.
  • तिबेटमधील उत्तरेकडील तळ १६ हजार ९०० फूट उंचीवर आहे, तर नेपाळमधील दक्षिणेकडील तळ १७ हजार ५९८ फूट उंचीवर आहे. जगातील सर्वात उंच माउंट एव्हरेस्ट शिखर २९ हजार फूट उंच आहे.
  • स्थानिक जनतेला वरदान
  • संरक्षण मंत्रालयाने बुधवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “स्थानिक लोकांसाठी हे वरदान ठरेल कारण लेह ते चिसुमले आणि डेमचोकला जोडणारा हा पर्यायी थेट मार्ग बनला आहे. यामुळे सामाजिक-आर्थिक स्थिती सुधारेल आणि लडाख मध्ये पर्यटनाला चालना मिळेल.”

 

चालकांसाठी अधिक आव्हानात्मक

  • प्रसिद्ध खारदुंग ला पासपेक्षा उमलिंग ला पास चालकांसाठी अधिक आव्हानात्मक असेल.
  • या पासचे तापमान तीव्र थंडीच्या काळात उणे ४० अंश सेल्सिअसपर्यंत घसरू शकते.
  • तसेच, या उंचीवर ऑक्सिजनची पातळी सामान्य स्थानांपेक्षा सुमारे ५० टक्के कमी आहे.
  • त्यामुळे येथे जास्त काळ राहणे कुणालाही अवघड झाले आहे.

 

BROचे कौशल्य आणि परिश्रम

मंत्रालयाने म्हटले आहे की, बीआरओने धोकादायक भागात आणि अत्यंत हवामानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संयम आणि कौशल्यामुळे ही कामगिरी केली आहे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: BoliviaBorder Roads OrganizationBROlehबॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनबोलिव्हियालेह
Previous Post

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल! “स्किन टू स्किन स्पर्श झाला तरच पोक्सोखाली गुन्हा” निकाल रद्द!!

Next Post

रेल्वे स्थानकांवर राहण्याची व्यवस्था, कसं आहे पॉड हॉटेल, किती भाडे, कोणत्या सुविधा?

Next Post
pod hotel

रेल्वे स्थानकांवर राहण्याची व्यवस्था, कसं आहे पॉड हॉटेल, किती भाडे, कोणत्या सुविधा?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!