Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ममतांविरोधात भाजपाकडून मनपा निवडणूकही हरलेल्या ‘प्रियंकां’ना का संधी?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
mamata banerjee-BJP

मुक्तपीठ टीम

पश्चिम बंगालच्या भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत् ममता बॅनर्जी तेथून लढणार असल्यानं ही पोटनिवडणूक महत्वाची आहे. भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपाने अॅड. प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देिली आहे. मनपा निवडणुकीसह प्रत्येक निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देण्यामागे नेमकं कारण ममतांविरोधात लढण्यासाठी मोठे नेते तयार नसल्याचे सांगितले जात आहे.

भवानीपूर पोटनिवडणूक का महत्वाची?

  • पश्चिम बंगालमध्ये ३ विधानसभेच्या जागांवर ३० सप्टेंबरला निवडणूक होत आहे.
  • समशेरगंज, जंगीपूर आणि भवानीपूरमध्ये पोटनिवडणुका होत आहेत.
  • भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.
  • विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून शुभेंदु अधिकारी यांनी १ हजार ९५६ मतांनी पराभूत केलं होतं.
  • परिणामी, मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ममता बॅनर्जींना ही निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे.

ममतांविरोधात प्रियंकांना संधी का?

  • भाजपला ममतांविरोधात पक्षातल्या मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं होतं.
  • मात्र ज्येष्ठ नेत्यांनी ममतांविरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
  • ज्येष्ठ नेत्यांना डिपॉजिट जप्त होण्याची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
  • विधानसभा निवडणुकाआधी पक्षाने भाजपत सहभागी झालेल्या मिथुन चक्रवर्तींशी संपर्क साधला. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.

कोण आहेत प्रियंका टिबरेवाल?

  • अॅडव्होकेट प्रियंका टिबरेवाल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.
  • तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्ण कमल यांनी त्यांचा ५८ हजार २५७ मतांनी पराभव केला होता.
  • प्रियंका टिबरेवाल यांना २०१५ मध्ये भाजपने कोलकाता मनपाच्या निवडणुकीत उतरवलं होतं. त्याठिकाणीही त्या पराभूत झाल्या होत्या.
  • ऑगस्ट २०२० मध्ये प्रियंका टिबरेवाल यांची भारतीय युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून वर्णी लागली.
  • दिल्ली महाविद्यालयातून त्या पदवीधर आहेत.
  • पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेप्रकरणी त्या पक्षाची बाजू सक्रियपणे लावून धरत आहेत.

ममतांनी भवानीपूरलाच का निवडलं?

  • २०११ मध्ये पहिल्यांदाच ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस सत्तेत आली.
  • त्यावेळी तृणमूलने ३४ वर्ष जुन्या डाव्या पक्षांना हादर दिला होता.
  • त्यावेळी ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवली होती.
  • त्यावेळी त्या जवळपास ५४ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या.
  • भवानीपूरमधल्या कालीघाटमध्ये ममता बॅनर्जी यांचं घर आहे.
  • २०१६ मध्ये ममतांनी याच जागेवरुन निवडणूक लढली आणि २५ हजार मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.
  • २०११ मध्ये भाजपला याच मतदारसंघातून फक्त ५ हजार ७८ मतं मिळाली होती. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत हा आक़डा ४७ हजारांच्याही पुढे गेला.
  • २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे उमेदवार सोनबदेब चटर्जी यांनी तब्बल २९ हजारांच्या फरकानं भाजपाचा पराभव केला होता.
  • त्या निवडणुकीत फक्त ५ हजार मते मिळवणारी काँग्रेस यावेळी लढत नाही.
  • ममता बॅनर्जींसाठी ही सुरक्षित जागा आहे.

Tags: Adv. priyanka tibrewalBJPMamata Banerjeeपश्चिम बंगालभवानीपूर
Previous Post

गोव्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून फडणवीसांच्या स्वागतासाठी ‘मी पुन्हा येईन’ व्यंगचित्र!

Next Post

देशात वर्षभरात बेरोजगारी वाढली! बेरोजगारीचा दर १०.३ टक्क्यांवर!!

Next Post
unemployment

देशात वर्षभरात बेरोजगारी वाढली! बेरोजगारीचा दर १०.३ टक्क्यांवर!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!