मुक्तपीठ टीम
पश्चिम बंगालच्या भवानीपूरमध्ये ३० सप्टेंबरला पोटनिवडणूक होत आहे. मुख्यमंत् ममता बॅनर्जी तेथून लढणार असल्यानं ही पोटनिवडणूक महत्वाची आहे. भवानीपूरमध्ये तृणमूल काँग्रेसकडून मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या विरोधात भाजपाने अॅड. प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देिली आहे. मनपा निवडणुकीसह प्रत्येक निवडणुकीत पराभूत झालेल्या प्रियंका टिबरेवाल यांना उमेदवारी देण्यामागे नेमकं कारण ममतांविरोधात लढण्यासाठी मोठे नेते तयार नसल्याचे सांगितले जात आहे.
भवानीपूर पोटनिवडणूक का महत्वाची?
- पश्चिम बंगालमध्ये ३ विधानसभेच्या जागांवर ३० सप्टेंबरला निवडणूक होत आहे.
- समशेरगंज, जंगीपूर आणि भवानीपूरमध्ये पोटनिवडणुका होत आहेत.
- भवानीपूरमधून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेत.
- विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममधून शुभेंदु अधिकारी यांनी १ हजार ९५६ मतांनी पराभूत केलं होतं.
- परिणामी, मुख्यमंत्री पदावर टिकून राहण्यासाठी ममता बॅनर्जींना ही निवडणूक जिंकणं महत्वाचं आहे.
ममतांविरोधात प्रियंकांना संधी का?
- भाजपला ममतांविरोधात पक्षातल्या मोठ्या नेत्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवायचं होतं.
- मात्र ज्येष्ठ नेत्यांनी ममतांविरोधात निवडणूक लढण्यास नकार दिला आहे.
- ज्येष्ठ नेत्यांना डिपॉजिट जप्त होण्याची भीती वाटत असल्याची चर्चा आहे.
- विधानसभा निवडणुकाआधी पक्षाने भाजपत सहभागी झालेल्या मिथुन चक्रवर्तींशी संपर्क साधला. मात्र त्यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला.
कोण आहेत प्रियंका टिबरेवाल?
- अॅडव्होकेट प्रियंका टिबरेवाल विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आहेत.
- तृणमूल काँग्रेसचे उमेदवार स्वर्ण कमल यांनी त्यांचा ५८ हजार २५७ मतांनी पराभव केला होता.
- प्रियंका टिबरेवाल यांना २०१५ मध्ये भाजपने कोलकाता मनपाच्या निवडणुकीत उतरवलं होतं. त्याठिकाणीही त्या पराभूत झाल्या होत्या.
- ऑगस्ट २०२० मध्ये प्रियंका टिबरेवाल यांची भारतीय युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा म्हणून वर्णी लागली.
- दिल्ली महाविद्यालयातून त्या पदवीधर आहेत.
- पश्चिम बंगालमधल्या विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसेप्रकरणी त्या पक्षाची बाजू सक्रियपणे लावून धरत आहेत.
ममतांनी भवानीपूरलाच का निवडलं?
- २०११ मध्ये पहिल्यांदाच ममता बॅनर्जींची तृणमूल काँग्रेस सत्तेत आली.
- त्यावेळी तृणमूलने ३४ वर्ष जुन्या डाव्या पक्षांना हादर दिला होता.
- त्यावेळी ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवली होती.
- त्यावेळी त्या जवळपास ५४ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या.
- भवानीपूरमधल्या कालीघाटमध्ये ममता बॅनर्जी यांचं घर आहे.
- २०१६ मध्ये ममतांनी याच जागेवरुन निवडणूक लढली आणि २५ हजार मतांच्या फरकाने त्या विजयी झाल्या.
- २०११ मध्ये भाजपला याच मतदारसंघातून फक्त ५ हजार ७८ मतं मिळाली होती. मात्र २०१४ च्या मोदी लाटेत हा आक़डा ४७ हजारांच्याही पुढे गेला.
- २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूलचे उमेदवार सोनबदेब चटर्जी यांनी तब्बल २९ हजारांच्या फरकानं भाजपाचा पराभव केला होता.
- त्या निवडणुकीत फक्त ५ हजार मते मिळवणारी काँग्रेस यावेळी लढत नाही.
- ममता बॅनर्जींसाठी ही सुरक्षित जागा आहे.