मुक्तपीठ टीम
२६ नोव्हेंबर २०२२ रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिला प्रवाशाने लघवी केल्याचा आरोप असलेला व्यक्ती हा मुंबईचा रहिवासी आहे. तो एका अमेरितन कंपनीचा भारतातील व्हाइस प्रेसिडेंट आहे. तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवला होता. त्याला अजून पकडण्यात आले नाही आहे. त्याचा विरोधात लुक आउट सर्कुलर जारी करण्याचे पत्र लिहिण्यात आले आहे.
एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी महिलेवर लघवी करणारा अमेरिकन कंपनीचा भारतीय VP!
- २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या JFK-दिल्ली फ्लाइटमध्ये एका वृद्ध महिलेवर लघवी करणाऱ्या शंकर मिश्राविरुद्ध लुक आउट सर्कुलर जारी करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी संबंधित प्राधिकरणाला पत्र लिहिले आहे.
- तो आरोपी पोलिस तपासात सहभागी होत नसल्याचा पोलिसांचा आरोप आहे.
- गेल्या वर्षी २६ नोव्हेंबर रोजी एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.
‘लघवी’ करण्याचा आरोप असणारा प्रवाशी हा मुंबईचा रहिवासी आहे. - आरोपी अमेरिकेतील एका बहुराष्ट्रीय कंपनीच्या इंडिया चॅप्टरचा उपाध्यक्ष आहे.
- त्याच्यावर एअर इंडियाच्या विमानात बसण्यास ३० दिवसांची बंदी घालण्यात आली आहे.
- पीडित महिला प्रवाशाला फ्लाइटचे संपूर्ण भाडे परत करण्यात आले आहे.
- गेल्या वर्षी २६ नोव्हेंबरला, न्यूयॉर्क-दिल्ली फ्लाइटमध्ये ‘बिझनेस क्लास’मध्ये मद्यधुंद प्रवाशाने त्याच्या सहप्रवाशावर लघवी केल्याचा आरोप आहे.
- महिला ज्येष्ठ नागरिक असून तिचे वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे.
- आरोपीच्या अटकेसाठी अनेक पथके रवाना झाली आहेत.
- त्याला पकडण्यात अजूनही यश आलेले नाही.
- डीजीसीएने एअर इंडिया आणि क्रू मेंबर्सना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.