Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कंझावला प्रकरण : तरुणीला १२ किमी फरफटत नेण्याची अमानुषता, ६ दिवसानंतरही गूढ तसंच!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
kanjhawala case

मुक्तपीठ टीम

कंझावला प्रकरणाने एक नवे वळण घेतलं आहे. अंजलीला १२ किमी फरफटत नेणाऱ्या कार मालक व या प्रकरणातील सहावा आरोपी आशुतोष याला दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. आशुतोष हा अपघात झालेल्या बलेनो कारचा मालक आहे. अंजलीचा अपघात त्याच्यामुळेच घडला आणि तो पोलिसांपासून हे सत्य लपवत असल्याचं सांगण्यात येत आहे. तो म्हणाला की अमितच त्याच्याकडे गाडी मागायला आला होता. दुसरीकडे अंजलीसोबत पार्टीत असण्याचा दावा करणारी तिची मैत्रीण निधीचीही पोलीस कसून चौकशी करत आहोत. देशाच्या राजधानीतील निर्भया प्रकरणाची आठवण करून देणाऱ्या या कंझावला प्रकरणाचे गूढ ६ दिवसांनंतरही उलगडलेले नाही.

पाच आरोपींना यापूर्वीच अटक…

  • कंझावला प्रकरणी दिल्ली पोलिसांनी यापूर्वी मनोज मित्तल, दीपक खन्ना, अमित खन्ना, कृष्णा आणि मिथुन या पाच आरोपींना अटक केली होती.
  • यासोबतच अपघाताला कारणीभूत असलेली बलेनो कारही पोलिसांनी जप्त केली आहे.
  • पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांतर्गत एफआयआर नोंदवला आहे.
  • यात गुन्हेगारी कट रचणे, हत्येचे प्रमाण नसलेले दोषी मनुष्यवध आणि निष्काळजीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरणे यासह गुन्हा दाखल केला आहे.
  • यापूर्वी अंजली अपघात प्रकरणात दिल्ली पोलिसांनी सांगितले होते की, या प्रकरणात ५ नव्हे तर ७ आरोपी आहेत.
  • पोलिसांनी आशुतोष आणि अंकुश खन्ना या दोन नवीन आरोपींची नावे जोडली होती.
  • आता पोलिसांनी गाडीचा मालक आशुतोष याला अटक केली आहे.

पोलीस तपासात ‘ही’ माहिती उघड…

  • गुरुवारी माहिती देताना पोलिसांनी सांगितले होते की, गाडी दीपक नव्हे तर अमित चालवत होता.
  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमितकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाव्हते.
  • अंकुश खन्ना यांनी दीपकला गाडी चालवत असल्याचे पोलिसांना सांगण्याचा सल्ला दिला होता.
  • त्याचवेळी विशेष पोलिस आयुक्त सागर प्रीत हुड्डा यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेज आणि कॉल डिटेल रेकॉर्डवरून आशुतोष आणि अंकुश खन्ना यांचा सहभाग निश्चित आहे.
  • आशुतोष आणि अंकुश खन्ना असे दोन जण आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
  • अंजलीला खेचून नेणारी कार चालवणारा आरोपी अपघाताच्या वेळी गाडीतही नव्हता, असा खुलासा पोलिसांनी केला आहे.
  • दीपकचे त्यावेळचे फोन लोकेशन या प्रकरणातील अन्य चार आरोपींशी जुळत नसल्याचे पोलिसांना आढळून आले.
  • त्याचे फोन लोकेशन आणि कॉल रेकॉर्डवरून तो दिवसभर घरीच असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Tags: Anjali AccidentAshutoshKhanzwala Caseआशुतोषकंझावला प्रकरण
Previous Post

शिक्षण आणि पद नाही बनवत सुसंस्कृत! एअर इंडियाच्या विमानात प्रवाशी महिलेवर लघवी करणारा अमेरिकन कंपनीचा भारतीय VP!

Next Post

हवेतील हायफाय बेवडेबाजी: पॅरिस – दिल्ली विमानातही एका प्रवाशानं केली होती वयोवृद्ध महिलेच्या ब्लँकेटवर लघवी! आता चौकशी!

Next Post
Air India

हवेतील हायफाय बेवडेबाजी: पॅरिस - दिल्ली विमानातही एका प्रवाशानं केली होती वयोवृद्ध महिलेच्या ब्लँकेटवर लघवी! आता चौकशी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!