Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एलॉन मस्क यांच्या नावाने मजेदार ट्वीट करणारे इयान वूलफोर्ड आहेत तरी कोण?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Twitter

मुक्तपीठ टीम

ट्विटरची सत्ता हाती घेत एलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. ट्विटर डील पूर्ण केल्यानंतर त्यांनी कंपनीच्या पॉलिसीमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या नावाने अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सुरुवातीला असे वाटले होते की या सर्व पोस्ट्स एलॉन मस्क करत आहेत, परंतु नंतर या सर्व पोस्टच्या मागे इयान वूलफोर्ड असल्याचे उघड झाले. ते असं का करतात या मागचे कारण काय हे जाणून घेऊया.

इयान वूलफोर्ड यांनी एलॉन मस्क यांच्या नावाने नुकतेच एक ट्वीट केले आहे जे सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की “ट्विटर तुझे तुकडे होणार, गॅंगलाही ८ डॉलर द्यावे लागतील.” जेव्हा हे ट्विट व्हायरल झाले तेव्हा सर्वांना वाटले की हे अकाउंट एलॉन मस्क यांचे आहे. पण, काही वेळाने कळले की हे अकाउंट एलॉन मस्क यांचे नसून इयान वूलफोर्ड यांचे आहे.

इयान वूलफोर्ड कोण आहे?

  • इयान वूलफोर्डबद्दल ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आहेत.
  • एवढेच नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूट आणि एशिया लिटरसी अॅम्बेसेडरमध्ये फेलोशिपही केली आहे.
  • हिंदी भाषेची आवड असलेल्या इयान वूलफोर्ड यांनी हिंदी साहित्यात पीएचडीही केली आहे.
  • इयान वूलफोर्ड यांना केवळ हिंदीच नाही तर मैथिली, अंगिका, भोजपुरी आणि नेपाळी अशा अनेक उत्तर भारतीय भाषांबद्दलही भरपूर ज्ञान आहे.

‘हिंदी’ भाषे प्रति प्रेम!

  • इयान वूलफोर्ड यांना हिंदी आणि ट्विट्सवरील प्रेमामुळे ट्विटरवर खूप लोकप्रियता मिळते.
  • त्यांना हिंदीबरोबरच भोजपुरी भाषेचेही चांगले ज्ञान आहे.
  • इयान वूलफोर्ड अनेकदा ट्विटरवर लेखक, कवी आणि हिंदी साहित्याशी संबंधित पुस्तकांशी संबंधित पोस्ट करत असतात.
  • इयान वूलफोर्ड यांचे ट्विटरवर जवळपास ९८ हजार फॉलोअर्स आहेत.

इयान वोल्फर्ड यांचा भारताशी संबंध?

हिंदीचे प्राध्यापक इयान वूलफोर्ड यांनी काही वर्ष भारतात घालवली आहे. ते सध्या प्रसिद्ध हिंदी लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्यावर आधारित ‘रेणू व्हिलेज: हिंदी लिटरेचर अँड नॉर्थ इंडियन ओरल ट्रेडिशन’ या पुस्तकावर काम करत आहेत. या पुस्तकात उत्तर भारतात चालू असलेल्या फील्डवर्कबद्दल बरीच माहिती मिळेल.


Tags: australiaelon muskIan WoolfordLa Trobe Universitymuktpeethtwitterइयान वूलफोर्डएलॉन मस्कऑस्ट्रेलिया ला ट्रोब विद्यापीठघडलं-बिघडलंट्विटरमुक्तपीठ
Previous Post

पोटनिवडणुकांचे निकाल : देशातील ७ पैकी ४ जागी भाजपा, ३ जागी शिवसेना, राजद, टीआरएस!

Next Post

अॅपलकडे फोल्डेबल आयफोन नाही! सॅमसंगची अॅपलला टोलेबाजी!!

Next Post
Samsung Foldable Smartphone And Apple

अॅपलकडे फोल्डेबल आयफोन नाही! सॅमसंगची अॅपलला टोलेबाजी!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!