मुक्तपीठ टीम
ट्विटरची सत्ता हाती घेत एलॉन मस्क हे ट्विटरचे नवे मालक बनले आहेत. ट्विटर डील पूर्ण केल्यानंतर त्यांनी कंपनीच्या पॉलिसीमध्ये अनेक बदल करण्यास सुरुवात केली. त्यांच्या नावाने अनेक प्रकारच्या पोस्ट शेअर केल्या जातात. सुरुवातीला असे वाटले होते की या सर्व पोस्ट्स एलॉन मस्क करत आहेत, परंतु नंतर या सर्व पोस्टच्या मागे इयान वूलफोर्ड असल्याचे उघड झाले. ते असं का करतात या मागचे कारण काय हे जाणून घेऊया.
इयान वूलफोर्ड यांनी एलॉन मस्क यांच्या नावाने नुकतेच एक ट्वीट केले आहे जे सध्या व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये लिहिले आहे की “ट्विटर तुझे तुकडे होणार, गॅंगलाही ८ डॉलर द्यावे लागतील.” जेव्हा हे ट्विट व्हायरल झाले तेव्हा सर्वांना वाटले की हे अकाउंट एलॉन मस्क यांचे आहे. पण, काही वेळाने कळले की हे अकाउंट एलॉन मस्क यांचे नसून इयान वूलफोर्ड यांचे आहे.
इयान वूलफोर्ड कोण आहे?
- इयान वूलफोर्डबद्दल ऑस्ट्रेलियातील ला ट्रोब विद्यापीठात हिंदीचे प्राध्यापक आहेत.
- एवढेच नाही तर त्यांनी ऑस्ट्रेलिया इंडिया इन्स्टिट्यूट आणि एशिया लिटरसी अॅम्बेसेडरमध्ये फेलोशिपही केली आहे.
- हिंदी भाषेची आवड असलेल्या इयान वूलफोर्ड यांनी हिंदी साहित्यात पीएचडीही केली आहे.
- इयान वूलफोर्ड यांना केवळ हिंदीच नाही तर मैथिली, अंगिका, भोजपुरी आणि नेपाळी अशा अनेक उत्तर भारतीय भाषांबद्दलही भरपूर ज्ञान आहे.
‘हिंदी’ भाषे प्रति प्रेम!
- इयान वूलफोर्ड यांना हिंदी आणि ट्विट्सवरील प्रेमामुळे ट्विटरवर खूप लोकप्रियता मिळते.
- त्यांना हिंदीबरोबरच भोजपुरी भाषेचेही चांगले ज्ञान आहे.
- इयान वूलफोर्ड अनेकदा ट्विटरवर लेखक, कवी आणि हिंदी साहित्याशी संबंधित पुस्तकांशी संबंधित पोस्ट करत असतात.
- इयान वूलफोर्ड यांचे ट्विटरवर जवळपास ९८ हजार फॉलोअर्स आहेत.
इयान वोल्फर्ड यांचा भारताशी संबंध?
हिंदीचे प्राध्यापक इयान वूलफोर्ड यांनी काही वर्ष भारतात घालवली आहे. ते सध्या प्रसिद्ध हिंदी लेखक फणीश्वरनाथ रेणू यांच्यावर आधारित ‘रेणू व्हिलेज: हिंदी लिटरेचर अँड नॉर्थ इंडियन ओरल ट्रेडिशन’ या पुस्तकावर काम करत आहेत. या पुस्तकात उत्तर भारतात चालू असलेल्या फील्डवर्कबद्दल बरीच माहिती मिळेल.