मुक्तपीठ टीम
व्हॉट्सअॅप यूजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर अनेक बदल करत आहे. या बदलांमध्ये व्हॉट्सअॅपने अनेक फिचर्स जोडलेले आहेत. यामुळे यूजर्सची व्हॉट्सअॅप वापरण्याची पद्धत आणि अनुभव पूर्णपणे बदलतो. इतकंच नाही तर, नवीन फीचर्स जोडल्यामुळे या प्लॅटफॉर्मवर नवीन पर्यायही मिळतात. व्हॉट्सअॅप सध्या आपल्या नवीन फीचरवर काम करत आहे. कंपनीने या फिचरला ‘मेसेज युवरसेल्फ’ असे नाव दिले आहे.
लवकरच ‘मेसेज युवरसेल्फ’ फिचर रोल आउट करण्याची व्हॉट्सअॅपची तयारी!
- व्हॉट्सअॅप ‘मेसेज युवरसेल्फ’ या फिचरची चाचणी करत होते, परंतु आता ते सर्व वापरकर्त्यांसाठी रोल आउट करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
- हे वन टू वन चॅट फीचर आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही रिमाइंडर्स, टू-डू लिस्ट आणि डॉक्युमेंट्स स्वतःसोबत शेअर करून सेव्ह करू शकता.
व्हॉट्सअॅपच्या ‘या’ नवीन फीचरबद्दल सविस्तर जाणून घ्या
- व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर आपल्याला स्वतःशीच कनेक्ट ठेवेल. . यामुळे स्वतःलाच मेसेज, कागदपत्रं, कामाच्या लिस्ट, खरेदीची लिस्ट, नोट्स इतर सर्वकाही पाठवता येईल.
- एवढेच नाही तर नोट्स बनवल्यानंतर त्यांना बुकमार्क करण्यासाठीही या फिचरचा वापर करू शकता.
- हे फिचर वापरण्यासाठी कोणतेही विशेष अॅप डाउनलोड करण्याची गरज नाही.
- हे फिचर अॅंड्रॉईड आणि आयओएस दोन्ही प्लॅटफॉर्मसाठी सादर केले जात आहे.
व्हॉट्सअॅपचे हे नवीन फीचर कसे काम करते?
- हे फीचर वापरण्यासाठी स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअॅप ओपन करावे लागेल.
- अॅप उघडल्यानंतर उजव्या कोपर्यात तळाशी दिलेल्या ऍक्सेस बटणावर क्लिक करा.
- येथे शीर्षस्थानी कॉन्टॅक्ट लिस्ट दिसेल. हे अपडेट आल्यानंतर कॉन्टॅक्ट लिस्टव आपले नाव दिसेल.
- या नावावर क्लिक करून स्वतःशी चॅट करता येईल.