मुक्तपीठ टीम
येणारी लोकसभा निवडणूक २०२४मध्ये आहे. पण भाजपाने त्यासाठीची तयारी दोन वर्षांच्या आधीच सुरु केली आहे. २०२४च्या निवडणुकांमध्ये सध्या मिळवलेल्या जागा कमी झाल्या तरी आपलं संख्याबळ वाढवण्यासाठी किंवा किमान टिकवण्यासाठी भाजपाने नियोजनात्मक प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी २०१९ मध्ये गमावलेल्या १४४ लोकसभा जागांवर एक खास योजना आखण्यात आली आहे.
२०१९मध्ये गमावल्या, २०२४मध्ये कमावण्याचं लक्ष्य!
- भाजपाने देशभरातील असे १४४ लोकसभा मतदारसंघ निवडले आहेत.
- हे तेच मतदारसंघ आहेत, जेथे २०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपा दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर होती.
- भाजपाने त्या जागांपैकी जास्तीत जास्त जागांवर पहिल्या क्रमांकावर पोहचण्यासाठी गंभीरतेने प्रयत्न केले जात आहेत.
- या जागांची जबाबदारी यापूर्वीच सर्व मंत्र्यांवर देण्यात आली आहे, जसा बारामती लोकसभा मतदार संघ अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना देण्यात आला आहे.
- यात काही जागा युतीतील मित्र पक्ष जिंकला होता, त्याही आहेत, जसे महाराष्ट्रातील कल्याण हा मतदार संघ शिवसेनेने जिंकलेला असूनही तिथे अनुराग ठाकुरांवर जबाबदारी आहे.
गांधी, पवार,यादव यांच्या जागांवर भाजपाचं लक्ष!!
- निवडलेल्या १४४ जागांमध्ये विरोधी पक्षांचे प्रतिनिधित्व आहे.
- उत्तर प्रदेशातील रायबरेलीत सोनिया गांधी, आणि मैनपुरीत मुलायम सिंह यादव.
- महाराष्ट्रातील बारामतीत सुप्रिया सुळे यांचा समावेश आहे.
‘त्या’ १४४ जागांवर पंतप्रधान मोदी-गृहमंत्री अमित शाहांच्या सभा
- मिशन २०२४ साठी निवडलेल्या जागा जिंकण्यासाठी भाजपा हायकमांडने एक समितीची स्थापना केली आहे.
- ही समिती या जागांशी संबंधित समस्या, लाभार्थी आदींच्या तपशीलवार माहिती गोळा करत आहे.
- पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह स्वतः प्रचारासाठी या मतदार संघांवर खास लक्ष देणार आहेत.
- या सर्व १४४ जागांवर त्यांच्या सभा घेण्यात येणार आहेत.