Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नवी मुंबईत पोलीस-शिंदे गटावर गंभीर आरोप करणारा शिवसेना नगरसेवक तडीपार

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Navi Mumbai Shiv Sena

मुक्तपीठ टीम

नवी मुंबईत शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. नवी मुंबई पोलिसांनी शिवसेनेचे माजी नगरसेवक एम के मढवी यांच्यावरी तडीपारीची कारवाई केली आहे. एम. के. मढवी यांनी काही दिवसांपू्र्वीच शिंदे गटावर गंभीर आरोप केले होते. ऐरोलीतील माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवी यांना नवी मुंबई पोलिसांनी ठाणे व मुंबई उपनगरे या जिल्ह्यांतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. तडीपारीची अंमलबजावणी करण्यात आली. यामुळे शिवसेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

दसरा मेळाव्यातील उद्धव ठाकरेंच्या भाषणातही उल्लेख

  • शिंदे गटात सामील होण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून दबाव टाकला जात आहे, असा आरोप मढवी यांनी केला होता.
  • दसरा मेळाव्यात, सत्तेचा गैरवापर करुन शिवसैनिकांना कसा त्रास दिला जातो असा उल्लेख शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला होता.
  • दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी मढवी यांचा उल्लेख केला होता.

शिंदे गट आणि पोलिसांवर गंभीर आरोप

  • मढवी यांना मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे.
  • काही दिवसांपूर्वीच एम के मढवी यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते. मढवी यांच्या आरोपांनुसार, “पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी शिंदे गटात सामील होण्यासाठी दबाव आणला. तसे न केल्यास नवी मुंबईतून तडीपार करू, एन्काऊंटर करू, अशा धमक्या दिल्या. माझ्याकडे १० लाखांची मागणीही केली.”
  • या आरोपांवर, निव्वळ तडीपारीची कारवाई होऊ नये म्हणून मढवी यांनी खोटे आरोप केल्याचा दावा पानसरे यांनी केला.

एम के मढवी यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेले गंभीर आरोप

  • एम के मढवी यांनी काही दिवकांपूर्वी पत्रकार परिषद घेत आरोप केले होते की, गेल्या दोन महिन्यापासून शिंदे गटात सामील होण्यासाठी शिंदे गटाकडून माझ्यावर दबाव टाकला जात आहे.
  • तुम्ही मातोश्रीवर जाऊ नका, माझ्याकडे आलात तर तुमचं, तुमच्या कुटुंबियांचं आणि कार्यकर्त्यांचं नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्या, असं मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.
  • नवी मुंबईचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनीही मला शिंदे गटात सामील व्हा, अन्यथा तुमचा एन्काऊंटर करू, अशी धमकी दिली.
  • त्यांनी माझ्यावर खोटे आरोप आणि खोट्या केसेस करून तडीपारीची कारवाई करण्याची नोटीसही दिल्याचा गंभीर आरोपही माजी नगरसेवक एम. के मढवी यांनी केला होता.

Tags: allegations against Shinde groupChief Minister Eknath Shindeformer Airoli corporator Manohar Krishna MadhavimuktpeethNavi Mumbai Shiv SenaShiv Sena corporator TadiparShiv Sena party chief Uddhav Thackerayऐरोली माजी नगरसेवक मनोहर कृष्णा मढवीघडलं-बिघडलंनवी मुंबई शिवसेनामुक्तपीठमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशिंदे गटावर आरोपशिवसेना नगरसेवक तडीपारशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे
Previous Post

रात्रीचे आठ…अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ!

Next Post

मिशन २०२४ : भाजपा ‘त्या’ १४४ लोकसभा मतदारसंघांमध्ये काय करणार?

Next Post
Sonia Sharad Modi And mulayam

मिशन २०२४ : भाजपा 'त्या' १४४ लोकसभा मतदारसंघांमध्ये काय करणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!