Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

न्यूज चॅनल्सचं रेटिंग पुन्हा सुरु! टीव्ही 9, २४ तास, एबीपी… कोणत्या मराठी न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, विशेष
0
marathi news channels week 10

मुक्तपीठ टीम

टीआरपी घोटाळ्यानंतर स्थगित करण्यात आलेले न्यूज चॅनल रेटिंग पुन्हा सुरु झाले आहे. या वर्षाच्या गेल्या म्हणजे १०व्या आठवड्याचे रेटिंग आज जाहीर झाले आहे. टीव्ही ९ मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे. तर झी २४ तास दुसऱ्या क्रमांकावर आले आहे, तर सातत्यानं नंबर १ असणारे एबीपी माझा न्यूज चॅनल तिसऱ्या क्रमांकावर आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  1. मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात २८.८ % वाट्यासह टीव्ही ९ मराठी हे न्यूज चॅनल नंबर १ ठरले आहे.
  2. दुसऱ्या क्रमांकावर २६.४ % वाट्यासह झी २४ तास आहे. चांगलीच मुसंडी मारली आहे.
  3. एबीपी माझा १८.७ % बाजार वाट्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
  4. चौथ्या क्रमांकावर साम टीव्ही १२% बाजार वाट्यासह आहे.
  5. पाचव्या क्रमांकावर ८.५ % बाजार वाट्यासह न्यूज १८ लोकमत आहे.
  6. सहाव्या क्रमांकावर नव्यानं सुरु झालेलं लोकशाही न्यूज चॅनल ५.७ % बाजार वाट्यासह आहे.

समजून घ्या कोणाचं कसं?

  • मराठी न्यूज चॅनलच्या रेटिंगमध्ये टीव्ही ९ आणि एबीपी माझामध्ये सातत्यानं स्पर्धा असते. दोन्ही चॅनलपैकी एक चॅनलच सातत्यानं नंबर १वर असतं. त्यातही एबीपी माझा गेल्या १४ वर्षात बहुतांश वेळा पहिल्या क्रमांकावर विराजमान राहिलं आहे. मात्र टीआरपी ब्रेकनंतरच्या या वर्षाच्या १०व्या आठवड्याच्या रेटिंगमध्ये टीव्ही ९ ने बाजी मारली आहे. टीव्ही ९ मराठी चॅनल क्रमांक एकवर दिमाखात आरुढ झालं आहे.
  • झी २४ तासने चांगली मुसंडी मारल्याचे दिसत आहे. फ्री टू एअर चॅनल असणाऱ्या टीव्ही ९ मागोमाग पे चॅनल असूनही २४ तासने दुसरे स्थान पटकावलं आहे. दोघांमधील फरक हा फक्त २ .४ टक्क्यांचा आहे.
  • तर एबीपी माझा १८.७ % बाजार वाट्यासह तिसऱ्या क्रमांकावर आहे. अनेकदा मराठी न्यूज चॅनलच्या बाजारात काहीवेळा एबीपी माझा मागे फेकला जातो. मात्र, काही आठवड्यातच पुन्हा हे चॅनल पुढे जात असतं. यावेळी मात्र फरक दहा टक्क्यांचा आहे.
  • चौथ्या क्रमांकावरील साम टीव्हीचा १२ टक्के हा बाजारातील वाटा आहे. त्यांचे वितरण लक्षात घेता तो वाईट म्हणता येणार नाही.
  • पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत चॅनेल अवघ्या ८.५ टक्के बाजार वाट्यावर रेंगाळले आहे. तेही पे चॅनल आहे.
  • मराठी न्यूज चॅनलच्या बाजारातील नवा खेळाडू असणारे लोकशाही न्यूज चॅनल सहाव्या क्रमांकावर आहे. या आठवड्यातील त्यांचा बाजार वाटा ५.७ आहे.  त्यांचे वितरण चांगले आहे.

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)


Tags: marathi news channels ratingTRPटीआरपीमराठी न्यूज चॅनल्स रेटिंग
Previous Post

सफाई कामगारांकरिता २९ हजार सेवा निवासस्थाने – मंत्री एकनाथ शिंदे

Next Post

गोव्यानंतर आता महाराष्ट्र! नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

Next Post
devendra fadnavis in nagpur

गोव्यानंतर आता महाराष्ट्र! नागपुरात देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!