मुक्तपीठ टीम
महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच महाराष्ट्र बोर्डाच्या १०वी म्हणजेच एसएससी आणि १२वी म्हणजेच एचएससी परीक्षेचे निकाल जाहीर करेल. परीक्षेला बसलेले विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahahsscboard.in वर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.
विद्यार्थ्यांची सोय लक्षात घेऊन बोर्डाने एक-दोन नव्हे तर चार वेबसाइटची यादी जाहीर केली असून, त्यावर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहेत.
महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी निकाल २०२० या वेबसाइटवर जारी केला जाईल
- mahahsscboard.in
- msbshse.co.in
- mh-ssc.ac.in
- mahresult.nic.in
महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची तारीख व वेळेची माहिती आधीच दिली जाईल. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निकाल जाहीर करू शकतात, अशी माहिती मिळत आहे. मागील वर्षी निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात रोल नंबर आणि आईचे नाव टाकावे लागत होते, या वर्षीही हीच प्रक्रिया अवलंबून विद्यार्थ्यांना त्यांचा दहावी आणि बारावीचा निकाल पाहता येईल.
महाराष्ट्र एसएससी आणि एचएससी निकाल २०२२ तपासण्याचे टप्पे
- सर्व प्रथम, विद्यार्थी मंडळाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
- वेबसाइटच्या होम पेजवर १०वी आणि १२वीच्या निकालांची लिंक दिसेल.
- निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- आता विद्यार्थ्यांचा निकाल तपासण्यासाठी रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
- सर्व माहिती भरा आणि निकाल तपासा. निकालाच्या पृष्ठाची प्रिंट आउट घ्या.