Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ नागरिकांची कोरोनामुळे बंद रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Railway Concessions

मुक्तपीठ टीम

रेल्वेत ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सवलत आता पूर्वीप्रमाणे होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्ष म्हणजेच सीपीआयचे नेते आणि खासदार विनय विश्वम यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना विनंती केली आहे की, कोरोना जागतिक महामारीपासून सुरू असलेल्या रेल्वे तिकीट भाड्यात ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सवलत पुनर्संचयित करावी.

देशभरातील कोट्यवधी जेष्ठ नागरिकांना सूट रद्द केल्यामुळे फटका

  • विश्वम यांनी एका पत्रात लिहिले आहे की, ज्येष्ठ नागरिकांना दिलेली सूट मागे घेण्याच्या रेल्वेच्या निर्णयामुळे देशभरातील कोट्यवधी जेष्ठ नागरिकांना फटका बसला.
  • ते म्हणाले की, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला होता, परंतु महामारीचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी वारंवार मागणी करूनही या निर्णयाचा आढावा घेण्यात आलेला नाही.

देशात सर्व सुरळीत सुरू झाल्यानंतर सूट पुनर्संचयित करा अशी मागणी

  • सीपीआयच्या नेत्यांनी सांगितले की भारतीय रेल्वेची स्थापना भारतातील लोकांना परवडणारी आणि प्रभावी वाहतूक साधन उपलब्ध करून देण्याच्या प्राथमिक उद्दिष्टाने करण्यात आली आहे.
  • गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ नागरिकांसह ५० वर्षांहून अधिक वयोगटातील प्रवाशांचा प्रवास किफायतशीर व्हावा यासाठी त्यांना भाड्यात सवलत दिली जात आहे.
  • तसेच, कोरोना महामारी आल्यापासून, जागतिक महामारी कमी झाल्यावर आणि देशात सर्व सुरळीत झाल्यावर ही सूट पुनर्संचयित केली जाईल अशी सुरक्षा आणि प्रतिबंधाच्या नावाखाली, या सवलती बंद केल्या गेल्या आहेत.

भारतातील जनतेचे खूप हाल झाले

  • सीपीआय नेते आणि खासदार विनय विश्वम म्हणाले की, कोरोना जागतिक महामारीचा वापर या सवलती कायमस्वरूपी काढून टाकण्यासाठी करण्यात आला. ज्यामुळे भारतातील लोकांचे मोठे नुकसान झाले.
  • सीपीआय नेत्याने सांगितले की मार्च २०२० ते मार्च २०२२ पर्यंत सात कोटींहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी रेल्वेचा वापर केला आणि सूट रद्द होत्या.
  • ते म्हणाले की, मी विनंती करतो की, रेल्वेतील ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेली सूट पुन्हा सुरू करावी.
  • अनेक ज्येष्ठ नागरिक पूर्ण तिकीट शुल्क भरण्याच्या स्थितीत नसल्यामुळे सूटची मुदत संपल्याने त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: CPI Leadergood newsIndian RailwayMP Vinay VishwammuktpeethRailway Concessionssenior citizensखासदार विनय विश्वमचांगली बातमीज्येष्ठ नागरिकभारतीय कम्युनिस्ट पक्षभारतीय रेल्वेमुक्तपीठरेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवरेल्वे सवलतसीपीआय नेते
Previous Post

अॅपल, गुगल, फेसबूक या ग्लोबल टेक कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची मंदीतही चांदी!

Next Post

गॅस सिलिंडरवरील २०० रुपये अनुदानाचा लाभ कुणाला आणि कसा मिळणार?

Next Post
LPG Gas Cylinder

गॅस सिलिंडरवरील २०० रुपये अनुदानाचा लाभ कुणाला आणि कसा मिळणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!