Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन, राहत्या घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास

'वाचणाऱ्याची रोजनिशी' या पुस्तकाला मिळाला होता साहित्य अकादमी चा पुरस्कार!!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Satish Kalsekar

मुक्तपीठ टीम

‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ लिहून वाचकांशी थेट संवाद साधणारे मराठीतील प्रख्यात कवी, संपादक व सामाजिक कार्यकर्ते सतीश काळसेकर यांचं शुक्रवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ते ७८ वर्षांचे होते. राहत्या घरी झोपेतच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. काळसेकर यांच्या निधनामुळे नवोदित लेखक, कवींचा हक्काचा मार्गदर्शक हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.

 

सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील काळसे गावी जन्मलेल्या काळसेकर यांचं शालेय शिक्षण सिंधुदुर्गातच झालं. मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केल्यानंतर काही काळ त्यांनी मासिक ज्ञानदूत व टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्यांनी नोकरी केली. काळसेकर यांच्या वाङ्‌मयीन कारकिर्दीची सुरुवात काव्य लेखनानं झाली. सुरुवातीला महाविद्यालयाच्या नियतकालिकातून, नवाकाळ, मराठा यांसारख्या वर्तमानपत्रातून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर विविध वाङ्‌मयीन नियतकालिकांतून त्यांच्या कविता प्रसिद्ध होत होत्या.

 

१९७१ मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह इंद्रियोपनिषद् प्रकाशित झाला. या कविता संग्रहानं त्यांना साहित्य वर्तुळात ओळख मिळवून दिली. त्यानंतर त्यांनी साहित्याच्या क्षेत्रात चौफेर मुशाफिरी केली. कविता, अनुवाद, गद्य असे वेगवेगळे साहित्य प्रकार हाताळले. ‘वाचणाऱ्याची रोजनिशी’ या त्यांच्या पुस्तकाला २०१४ सालच्या ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. ‘लोकवाड्मय वृत्त’चे 20वर्ष पेक्षा जास्त काळ संपादक होते. लोकवाडमय प्रकाशन गृहाच्या जडणघडण मध्ये महत्वाची भूमिका त्यांनी बजावली.

 

साहित्यिक प्रगतशील चळवळीत महत्वाची भूमिका घेणाऱ्या ‘प्रगतिशील लेखक संघ महाराष्ट्र’चे अध्यक्षही होते. कवी , लेखक , साहित्यिक चळवळी शी जवळचा संबंध त्यांचा होता. कवी नारायण सुर्वे, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या सोबत साहित्य चळवळीत काम केले. कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनाच्या आयोजनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. ते कॉम्रेड अण्णा भाऊ साठे साहित्य संमेलनचे अध्यक्ष म्हणून धुराही सांभाळली होती. लेखक आणि वाचकातला दुवा हरपला आहे. नाशिक येथील कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाशी ते साहित्य प्रेमातून जोडले गेले होते. परिवर्तनवादी चळवळीचा मार्गदर्शक आज हरपला आहे. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
लाल सलाम!!

 

(कॉम्रेड राजू देसले हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य सचिव मंडळाचे सदस्य आणि नाशिकच्या कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त आहेत.)
संपर्क ७०६६६६९८९४


Tags: marathimumbaiVeteran Poet Satish Kalsekarकॉम्रेड राजू देसलेज्येष्ठ कवी सतीश काळसेकर
Previous Post

“तळयेमधील निष्पाप वळी हे बेपर्वा सरकार व भावनाशून्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी”: प्रविण दरेकर

Next Post

जयंत पाटील सांगलीत, अधिकाऱ्यांशी सतत संपर्क, धरणांमधून योग्य विसर्गावर लक्ष

Next Post
jayant patil

जयंत पाटील सांगलीत, अधिकाऱ्यांशी सतत संपर्क, धरणांमधून योग्य विसर्गावर लक्ष

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!