Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जयंत पाटील सांगलीत, अधिकाऱ्यांशी सतत संपर्क, धरणांमधून योग्य विसर्गावर लक्ष

रात्रभर अधिकार्‍यांच्या फोनवरुन संपर्कात राहून जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांनी सांगली, कोल्हापूर,सातारा भागातील पूरपरिस्थितीचा घेतला आढावा...

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
jayant patil

मुक्तपीठ टीम

मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे सतत अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कात राहून सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आढावा घेत आहेत. गुरुवारी ते संपूर्ण रात्रभर संपर्कात होते. आज सकाळी संपूर्ण आढावा घेतल्यानंतर त्यांनी सांगतिले की, “महाराष्ट्रातील धरणांमधून पाण्याचा योग्य विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणाच्या पाण्याबाबतही नियंत्रण ठेवले जात आहे. प्रशासन मोठ्या जोमाने काम करत आहे, आपल्या सेवेसाठी तत्पर आहे. पुढील २-३ दिवसात पावसाची तिव्रता कमी झाली तर पाण्याचा निचरा होण्यास सुरुवात होईल आणि मोठे संकट टळेल.”

शुक्रवारी सकाळी पुण्यातील नियोजित कार्यक्रम उरकून जनतेच्या चिंतेने जयंत पाटील सांगलीत दाखल झाले. पुण्यात नियोजित कार्यक्रम सुरू असतानाही आणि कार्यक्रम संपल्यानंतर सांगलीकडे रवाना होताना गाडीतही जयंत पाटील हे सांगली, कोल्हापूर, सातारा या विभागातील पूरपरिस्थितीचा आढावा घेताना नियोजन कसे करायचे याची चर्चा अधिकार्‍यांशी करत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते.

 

पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा

सांगली जिल्ह्यात शुक्रवारी सरासरी ५९.६ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, शिराळा तालुक्यात १५४.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला असल्याने सांगलीकरांवर पुन्हा एकदा २०१९ च्या महापुराचे सावट निर्माण झाले आहे याच चिंतेने मंत्री जयंत पाटील यांनी परिस्थितीची माहिती घेतली.

पश्चिम महाराष्ट्रातील २०१९ चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे


Tags: jayant patilNCPsangaliकृष्णा नदीजंयत पाटीलपश्चिम महाराष्ट्र
Previous Post

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन, राहत्या घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास

Next Post

“महाराष्ट्रातील स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष”

Next Post
devendra fadanvis

"महाराष्ट्रातील स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!