Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“तळयेमधील निष्पाप वळी हे बेपर्वा सरकार व भावनाशून्य प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचे बळी”: प्रविण दरेकर

July 24, 2021
in घडलं-बिघडलं
0
pravin darekar

मुक्तपीठ टीम

रायगड, महाडमध्ये अस्मानी संकट कोसळले असताना तळये गावात दरड कोसळल्यामुळे ३६ निष्पापांना आपले जीव गमवावे लागले. निगरगट्ट व बेजबाबदार प्रशासकीय यंत्रणा सुमारे २० ते २२ तासांनी दुर्घटनास्थळी पोहोचली. भावनाशून्य प्रशासन व बेजाबदार सरकारमुळे येथील पुरग्रस्तांना वेळीच मदत पोहोचली नाही. जिल्हाधिकारी, प्रांत, व साधा तलाठीसुद्धा या ठिकाणी वेळेत न पोहोचल्यामुळे ग्रामस्थांनी पुढाकार घेत मदतकार्य केले. पावसाची तमा न बाळगता विरोधी पक्षातील नेते या ठिकणी वेळेत पोहोचू शकतात तर सत्ताधारी मंत्री, आमदार व प्रशासकीय यंत्रणेतील बेजबाबदार बाबू कुठे गायब झाले होते, असा रोखठोक सवाल तळये येथील दुर्घटनास्थळी उपस्थित असलेले विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केला. त्यांच्यासोबत माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे पूरग्रस्तांच्या मदतकार्यात सहभागी झाले होते.

pravin darekar

काल रात्री दरेकर माणगाव येथील पूरग्रस्तांच्या बचावकार्यात सहभागी झाले तर आज सकाळी माणगाव, महाड येथील पूरस्थितीची पाहणी करीत येथील नागरिकांना मदतीचा हात दिला. महामार्गावर वाहनांमध्ये अडकून पडलेल्या नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. काहींची त्यांनी निवासाची व्यवस्था केली. त्यानंतर पुढे पावसातच खडतर मार्गक्रमण करीत तळये गावातील दुर्घटनास्थळी पोहोचून दरेकर नागरिकांच्या मदतकार्यात सामील झाले. त्यानंतर पूरामुळे नुकसान झालेल्या महाड येथील एसटी डेपोची तसेच तेथील बाजारपेठेची पाहणी केली व त्यांना मदत पोहचविण्याच्या दृष्टीने दरेकर यांनी प्रशासकीय यंत्रणांना सूचना दिल्या. तळये गावात दरड कोसळण्याची घटना काल सायंकाळी ४ वाजता घडूनदेखील आतापर्यंत सरकारची काहीही मदत किंवा प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी पोहोचली नाही. इथे तलाठीही नाही, जिल्हाधिकारी नाही. विरोधी पक्षनेते व भाजपाचे आमदार, कार्यकर्ते धडपडत गावात पोहोचतात, परंतु सरकारच्या हलगर्जीपणा आणि बेपर्वाईमुळे तळये येथील बळी गेले आहेत. सरकारी यंत्रणा वेळेवर पोहोचली असती तर काही जीव वाचवता आले असते, अशी खंत तळये गावातून प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.

pravin darekar

तळये गावात स्थानिक ग्रामस्थ व तरुणांकडून बचावकार्य सुरू असताना राज्य सरकारला मात्र या दुर्घटनेचे काहीही सोयरसुतक दिसले नाही. कोकणातील घरे डोंगरावर वसलेली असल्यामुळे शासकीय यंत्रणांनी पूर्वीच काळजी घेतली गेली पाहिजे होती. आधीच लोकांना सुरक्षित स्थळी हलविले असते तर काही जीव आपल्याला नक्कीच वाचवता आले असते, असेही प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.

pravin darekar

रायगड, महाड येथील मुसळधार जलप्रलयात अडकलेल्या नागरिकांच्या बचावकार्यासाठी मुसळधार पावसाची तमा न बाळगता विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन, आमदार निरंजन डावखरे मुंबईतून संततधार पावसात अतिशय खडतर प्रवास करत गुरुवार, २२ जुलै रोजी प्रविण दरेकर माणगावजवळील तासगाव टोल नाक्यापर्यंत कसेबसे पोहोचले. परंतु रस्त्यावर जवळजवळ ६ ते ८ फूट पाणी असल्यामुळे व मार्ग बंद असल्यामुळे रेस्क्यू टीमने पुढे जाण्यास अटकाव केला. परंतु सकाळ होताच प्रविण दरेकर यांनी रेस्क्यू टीम व एनडीआरएफसोबत चर्चा करून येथील पूरपरिस्थितीची व बचावकार्याची माहिती घेतली. पूरपरिस्थितीत अडकलेल्या नागरिकांना दरेकर यांनी जीवनावश्यक वस्तू देत संकटात अडकलेल्या जनतेला धीर दिला.

pravin darekar

महाडकरांच्या बचावाकरता सरकारी यंत्रणेने बोटीने येण्याची आवश्यकता होती. एनडीआरएफची टीमही उशिरा पोहोचली. ठाणे येथून तरुण मुले मदतीला आली असून ग्रामस्थांच्या मदतीने तळये येथे दरडीखाली दबले गेलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले, पण परंतु प्रशासकीय अधिकारी त्यांच्या मदतीला वेळेत पोहोचू शकले नाहीत ही शरम आणणारी गोष्ट असल्याचे दरेकर यांनी सांगितले.


Tags: flood situationgirish mahajanLandslideMaharashtrapravin darekarप्रविण महाजन
Previous Post

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये ४९ जागांसाठी भरती

Next Post

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन, राहत्या घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास

Next Post
Satish Kalsekar

ज्येष्ठ कवी सतीश काळसेकर यांचं निधन, राहत्या घरी झोपेतच घेतला अखेरचा श्वास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!