Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वंदे भारत ट्रेनची पुन्हा गायीशी टक्कर! अर्धा तास जागीच खोळंबा, पुढचा भाग तुटला!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Vande Bharar Accident Again In Gujarat, Third Incident In One Month

मुक्तपीठ टीम

सेमी हायस्पीड ट्रेन वंदे भारत एक्सप्रेसचा गुजरातमध्ये पुन्हा अपघात झाला आहे. अचानक गाय ट्रेनसमोर आल्याने या ट्रेनचा पुढचा भाग तुटला आहे. वलसाडमधील अतुल रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. महिनाभरातील ही तिसरी घटना आहे. अपघातानंतर ट्रेन जवळपास २६ मिनिटे स्टेशनवर थांबवण्यात आली होती. अपघातानंतर काही वेळातच मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्स्प्रेस आपल्या इच्छित स्थळी रवाना करण्यात आली.

शनिवारी सकाळी ८.१७ वाजता हा अपघात झाला. त्यावेळी ट्रेन अतुल रेल्वे स्थानकावरून जात होती. अपघातानंतर ट्रेन जवळपास २६ मिनिटे स्टेशनवर उभी होती. सकाळी ८.४३ च्या सुमारास ती इच्छितस्थळी रवाना झाली. या धडकेत वंदे भारत एक्सप्रेसचे कपलर कव्हर आणि बीसीयू कव्हरचेही नुकसान झाले आहे. रेल्वेचा पाणीपुरवठाही विस्कळीत झाला. ट्रेनचा वेग जास्त असल्याने एक बोगीही धक्क्याने वेगळी झाली.

याआधीही झाले होते अपघात-

या महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी या ट्रेनला दोनदा अपघात झाला होता. मुंबईहून अहमदाबादला जाणार्‍या वंदे भारतची वाटवा आणि मणिनगर स्थानकाजवळ म्हैशींच्या कळपाला धडकली होती. यानंतर वडोदरा विभागातील आणंदजवळ एक गाय या ट्रेनला धडकली. या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे.

देशाची पहिली हायस्पीड रेल्वे !!

  • वंदे भारत ही मुंबई आणि गांधीनगर दरम्यान धावणारी देशातील तिसरी सेमी हायस्पीड ट्रेन आहे.
  • वंदे भारत अपघात प्रतिबंधक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० सप्टेंबर रोजी या मार्गावरील ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला होता.
  • तिचा वेग ताशी १८० किमी आहे. भविष्यात हा वेग ताशी २०० किमी करण्याचा विचार आहे.
  • वंदे भारत एक्सप्रेसमध्ये प्रवाशांची सुरक्षा व आरामावर खास लक्ष्य देण्यात आले आहे.
  • सीसीटीव्ही कॅमेरे व वायफाय सुविधेसह अपग्रेडेड ट्रेनमध्ये ३ तासांचे बॅटरी बॅकअपही देण्यात आले आहे.

Tags: AccidentCowgujratVande Bharat Express Trainअपघातगायगुजरातवंदे भारत एक्स्प्रेस
Previous Post

आता किशोरी पेडणेकर सोमय्यांचं लक्ष्य! एसआरए प्रकरणी गंभीर आरोप!

Next Post

जगातील सर्वात मोठी शंकराची मूर्ती राजस्थानात! नाथद्वारा इथं लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ!!

Next Post
World's Tallest Lord Shankar Statue

जगातील सर्वात मोठी शंकराची मूर्ती राजस्थानात! नाथद्वारा इथं लोकार्पण सोहळ्याचा शुभारंभ!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!