Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यापीठाची जमीन

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
University Jalgaon district

मुक्तपीठ टीम

जळगाव जिल्ह्यातील पाळधी बुद्रुक पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यापीठाची जमीन जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील पाळधी या ग्रामपंचायतीसाठी पाणीपुरवठा योजनेसाठी जमिनीची गरज होती. जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता पाण्याची टाकी व फिल्टर प्लँट उभारण्यासाठी जागा आवश्यक होती. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या ताब्यात तेथे जमीन आहे. त्यातील २ एकर जमीन उपलब्ध करून देण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी यासंदर्भातील कार्यवाही जलदगतीने होण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावचा पाणीप्रश्न सुटला आहे.

 

ग्रामपंचायत पाळधी बु. (ता. धरणगाव) (जिल्हा जळगाव) करिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता पाण्याची टाकी व फिल्टर प्लँट उभारण्याबाबत दूरदृष्य प्रणालीद्वारे बैठक पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्रशिक्षण मंत्री यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत, श्री.वायूनंदन, सुभाष भुजबळ, शिवशंकर नाईक उपस्थित होते.

 

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले, ग्रामपंचायत पाळधी बु. (ता. धरणगाव) (जिल्हा जळगाव) करिता जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाणीपुरवठा योजनेकरिता पाण्याची टाकी व फिल्टर प्लँट उभारण्यासाठी विद्यापीठाच्या ताब्यातील २ एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात येईल. गावातील लोकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होण्यासाठी याठिकाणी पाण्याची टाकी उभी करण्यात येणार असून या योजनेमुळे विद्यापिठाला आणि गावाला पाणीपुरवठा केला जाणार आहे.यासाठी लागणारी दोन एकर जागा विद्यापीठाने उपलब्ध करुन द्यावी. ही जमिन विद्यापिठाच्या नावावर असणार आहे. जिल्हाधिकारी यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करुन तातडीने कुलगुरुंकडे पाठवावा. यामध्ये जमिनीचा सर्व्हे नंबर देवून दोन एकर जागेचा उल्लेख करण्यात यावा. विद्यापिठाने यावर तातडीने कार्यवाही करुन एनओसी उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देशही श्री.सामंत यांनी दिले.

 

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, येथील गावातील लोकांनी विद्यापिठाला जमिनी उपलब्ध करुन दिल्या आहे. नळ पाणी पुरवठा योजना सर्वांसाठी आहे. या योजनेमुळे येथील गावाला व विद्यापीठाला पाणी मिळणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.


Tags: Dharangaongood newsGram Panchayat PaldhiHigher and Technical Education Minister Uday SamantjalgaonMarathi Bhasha Pandharvadamuktpeethsocial activitiesWater Supply Minister Gulabrao PatilWater supply schemeउच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतग्रामपंचायत पाळधीजळगावधरणगावपाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटीलपाणीपुरवठा योजनामुक्तपीठ
Previous Post

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिकांशी संवाद

Next Post

पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमध्ये ६५ जागांवर नोकरीची संधी

Next Post
Bombay Engineer Group & Center Khadki

पुण्याच्या बॉम्बे इंजिनीअर ग्रुप अॅंड सेंटर खडकीमध्ये ६५ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!