Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त युवा साहित्यिकांशी संवाद

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा

मुक्तपीठ टीम

राज्य शासनाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा केला जात आहे. या अंतर्गत भाषा संचालनालयातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात मी का लिहितो? या विषयावरील मान्यवरांच्या व्याख्यानासह कवी संमेलन, शालेय विद्यार्थी आणि वाचन, भाषा आणि जीवन यासह इतर विषयावर तज्ञांद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमांपैकी काही ऑनलाईन तर काही ऑफलाईन पद्धतीने होणार आहेत. भाषा संचालनालयाच्या वतीने मराठी भाषा पंधरवड्यात कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 17 जानेवारी

मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी तरुण कवींचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कवी संमेलनाचे अध्यक्ष महेश दत्तात्रय लोंढे असतील. यात कवी अनिल साबळे, पवन नालट, प्रशांत केंदळे, विशाखा विश्वनाथ, अविनाश उषा वसंत, प्रदीप कोकरे, वृषाली विनायक, अक्षय शिंपी, कमलेश महाले कुमार सहभागी होणार आहेत. सूत्रसंचालन नामदेव कोळी, आभार प्रकटन भारत जाधव करतील.

 

दि. 18 जानेवारी

आभासी परिसंवाद- मराठी खऱ्या अर्थाने ज्ञानभाषा होईल का? याचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादाचे आयोजक वाडिया महाविद्यालय, पुणे हे आहेत. या परिसंवादात वक्ते – अच्युत गोडबोले, दिनकर गांगल, अनिल गोरे, विवेक सावंत, अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, सूत्रसंचालन – प्रा.मनोहर सानप, प्रास्ताविक – भारत जाधव करणार आहेत.

 

दि. 19 जानेवारी

आभासी व्याख्यान – मी काय वाचतो?या विषयावर वक्ते नितीन वैद्य, सोलापूर, हे व्याख्यान देणार आहेत. या व्याख्यानाचे आयोजक – भाऊसाहेब नेने महाविद्यालय, पेण हे आहेत. अध्यक्ष : विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक : डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन :- डॉ.मनीषा पाटील करणार आहेत.

 

दि. 20 जानेवारी

आभासी व्याख्यान- प्रशासनात मराठी भाषेचे उपयोजन वक्ते – विजया डोनीकर, भाषा संचालक, आयोजक – संत गोन्साल्वो महाविद्यालय, वसई, अध्यक्ष : सोमनाथ विभुते, प्राचार्य, प्रास्ताविक- संतोष गोसावी

 

दि. 21 जानेवारी

आभासी चर्चासत्र- शालेख विद्यार्थी आणि वाचन संस्कृती, आयोजक श्रीमती दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. सहभाग – दीपा देशमुख, पुणे, सुरेश सावंत, नांदेड, नामदेव माळी, सांगली, रमेश पानसे, अध्यक्ष -विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक -डॉ.संजय पवार, सूत्रसंचालन – प्रा.राजश्री कुलकर्णी

 

दि. 24 जानेवारी

व्याख्यान -मुखी माझ्या रमो माय मराठी, प्राचार्य डॉ. महेशचंद्र जोशी, चेतना महाविद्यालय, वांद्रे आयोजक. अध्यक्ष- श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण. आभार प्रकटन भारत जाधव

 

दि. 25 जानेवारी

व्याख्यान- भाषा आणि जीवन. वक्ते -डॉ. संतोष बोराडे, स्थळ- महात्मा गांधी विद्यालय, वांद्रे (पूर्व), अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक व सूत्रसंचालन आनंद गांगण, आभार प्रकटन -संतोष गोसावी

 

दि. 27 जानेवारी

आभासी चर्चासत्र (फेसबुक लाईव्ह) मराठी विद्यापीठ कसे असावे ? आयोजक -विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय, टेंभूर्णी जि. सोलापूर. वक्ते : लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. रणधीर शिंदे, श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले (अध्यक्ष), संवादक – डॉ. महेंद्र कदम, अध्यक्ष : श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक – भारत जाधव

 

दि. 28 जानेवारी

समारोप

साहित्य अभिवाचनाने समारोप होणार आहे. यात भाषा संचालनालय येथिल अधिकारी व कर्मचारी सहभागी होणार आहेत. अध्यक्ष -श्रीमती विजया डोनीकर, भाषा संचालक, प्रास्ताविक संतोष गोसावी करतील असे भाषा संचालक यांनी कळविले आहे.

 


Tags: Literary recitation concludesMarathi Language Conservation FortnightmuktpeethSahitya Akademi Awardstate governmentVirtual SeminarYouth Literary Dialogueआभासी चर्चासत्रमराठी भाषा संवर्धन पंधरवडायुवा साहित्यिक संवादराज्य शासनसाहित्य अकादमी पुरस्कार २०२१साहित्य अभिवाचन समारोप
Previous Post

महाराष्ट्र परिचय केंद्राचा ‘मराठी भाषा पंधरवडा’, ट्विटर मोहीम, लघुपट, मराठी महतीची व्याख्यानं

Next Post

जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यापीठाची जमीन

Next Post
University Jalgaon district

जळगाव जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनेसाठी विद्यापीठाची जमीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!