मुक्तपीठ टीम
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) ने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशात वर्षक्षरात बेरोजगारीचा दर २.४ टक्क्यांवरुन १०.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. NSO ने ही आकडेवारी जारी केलेली आकडेवारी सर्व चांगलं घडत असल्याच्या सरकारी दाव्यांना छेद देणारी आहे.
काय आहे NSO चा सर्वे?
- एप्रिल २०१७ पासून NSO ने सर्वेक्षणाला सुरुवात केली.
- १ लाख ७१ हजार ५५३ नागरिकांच्या आधारे सर्वेक्षणाचे आकडे जाहीर कऱण्यात आलेत.
- ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० दरम्यान बेरोजगारी दर १०.३%
- ऑक्टोबर ते डिसेंबर २०१९ दरम्यान हाच बेरोजगारी दर ७.८%
- जुलै ते सप्टेंबर २०२० दरम्यान बेरोजगारी दर १३.३%
- ऑक्टोबर- डिसेंबर २०२० मध्ये शहरी भागात श्रम बल भागीदारी दर ३७.३ टक्के होता.
- या सर्वेक्षणामुळे देशातला दर महिन्यातला बेरोजगारीचा दर, कामगारांची संख्या, श्रम बल भागीदारी दर आणि वर्तमानातल्या आठवड्याच्या स्थितीबाबत माहिती मिळते.
- ऑक्टोबर – डिसेंबर दरम्यान ४३ हजार ६९३ कुटुंब आणि १ लाख ७१ हजार ५५३ नागरिकांच्या आधारावर सर्वेक्षणाची ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे.