Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १२वा हप्ता होणार जमा! पंतप्रधान मोदी १६ हजार कोटी जारी करणार

September 5, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojana

मुक्तपीठ टीम

केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान योजनेच्या लाभार्थ्यांना दिवाळीची भेट दिली आहे. शेतकऱ्यांचा सणासुदीचा काळ आणखी आनंददायी होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या १२व्या हप्त्याची प्रतीक्षा आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पीएम किसान योजनेच्या १२व्या हप्त्यासाठी १६ हजार कोटी रुपये जारी करणार आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय कृषी संशोधन संस्था, पुसा, दिल्ली येथे सोमवारी पीएम किसान सन्मान संमेलनाचे उद्घाटन करतील आणि प्रसंगी थेट लाभ हस्तांतरणाद्वारे पीएम-किसान योजनेचे उद्घाटन करतील. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपयांचा १२वा हप्ता जारी करेल.”

शेतकऱ्यांच्या खात्यात योजने अंतर्गत आज पैसे जमा होणार!

  • केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त या वर्षी मे महिन्यात हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला येथे किसान सन्मान निधीचा ११वा हप्ता म्हणून २१ हजार कोटी रुपये जारी केले होते.
  • कृषी मंत्रालयाने सांगितले की, पंतप्रधान मोदी १७ ऑक्टोबर रोजी पीएम किसान सन्मान संमेलन २०२२ या दोन दिवसीय कार्यक्रमाचे उद्घाटन करतील आणि शेतकरी आणि कृषी स्टार्टअप, संशोधक, धोरणकर्ते, बँकर्स आणि इतर भागधारकांना संबोधित करतील.

३ हप्त्यांमध्ये २ हजार रुपयांनुसार करून एकूण ६ हजार रूपये मिळतात

  • देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत, सरकार दर ४ महिन्यांच्या अंतराने शेतकऱ्यांसाठी २ हजार रुपयांचे तीन हप्ते जारी करते.
  • अशाप्रकारे ही रक्कम शेतकऱ्यांना वर्षभरात तीन हप्त्यांमध्ये दिली जाते.
  • सरकार हे पैसे तीन समान हप्त्यांमध्ये पाठवते. सध्या बाराव्या हप्त्याची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते.
  • आधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनेचे लाभ थेट पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे हस्तांतरित केले जातात.

पीएम किसान संमेलनात १३ हजाराहून अधिक शेतकरी उपस्थित राहणार

  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, दोन दिवसीय पीएम किसान संमेलन देशभरातील १३ हजार ५०० हून अधिक शेतकरी आणि १ हजार ५०० कृषी स्टार्टअप्स एका व्यासपीठावर आणतील आणि १ कोटीहून अधिक शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होतील.
  • यामध्ये ७०० कृषी विज्ञान केंद्रे, ७५ ICAR संस्था, ७५ राज्य कृषी विद्यापीठे, ६०० पीएम किसान केंद्रे, ५० हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्था आणि २ लाख समुदाय सेवा केंद्रे अशा विविध संस्थांचा समावेश आहे.

डीबीटीमधून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

  • पंतप्रधान किसान सन्मान संमेलनाच्या पहिल्या दिवशी, पंतप्रधान डीबीटीमधून कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या PM-किसान या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना १६ हजार कोटी रुपयांचा १२वा हप्ता जारी करतील.
  • मंत्रालयाने म्हटले आहे की, PM-KISAN हे पंतप्रधानांच्या निरंतर वचनबद्धतेचा परिणाम आहे आणि सर्वसमावेशक आणि उत्पादक कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक कृती सुरू करणे आणि सार्वजनिक कार्यक्रम राबविण्याचे उद्दिष्ट आहे.

पाहा:


Tags: farmersgood newsmuktpeethPradhan Mantri Kisan Samman Nidhi Yojanauseful newsउपयोगी बातमीघडलं-बिघडलंचांगली बातमीपंतप्रधान किसान सन्मान निधी योजनामुक्तपीठशेतकरी
Previous Post

IRCTC तिकीट बुकिंग: QR कोडने मिळवा तिकीट, नवी बुकिंग सिस्टम!

Next Post

न्यु-जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० नव्या अवतारात लवकरच होणार लाँच!!

Next Post
Royal Enfield Company

न्यु-जनरेशन रॉयल एनफील्ड बुलेट ३५० नव्या अवतारात लवकरच होणार लाँच!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!