Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

UIDAI तर्फे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘आधार हॅकेथॉन २०२१’ चे आयोजन!

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, घडलं-बिघडलं
0
aadhar hackathon

मुक्तपीठ टीम 

UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) द्वारे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘आधार हॅकेथॉन २०२१ चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी तरुण नवकल्पनाकारांना डोळ्यांसमोर ठेवले गेले आहे, जे सध्या विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये आहेत. वास्तविक जगात पाऊल टाकण्यास जे उत्सुक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, हॅकेथॉन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुरू होईल आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.

 

स्वातंत्र्याचा अनोखा उत्सव

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणुन साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
  • हे तंत्रज्ञानातील नवकल्पना साजरे करण्याचे आणि सेवा वितरण पुढील स्तरावर नेण्याचे वर्ष आहे.
  • आधारसाठी हे वर्ष देखील महत्त्वपुर्ण आहे.
  • आधार नागरिकांच्या अनुभवामध्ये आणि यूआयडीएआयद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांमध्ये आणखी सुधार करण्याच्या हेतूने कार्यरत आहे.
  • आधार नव्या सुधारणासोबत पुढील दशकात प्रवेश करत आहे.

 

आधार हॅकेथॉन २०२१ दोन थीमवर आधारित आहे. पहिला विषय नावनोंदणी आणि अद्यतनांशी संबंधित आहे, जे प्रत्यक्षात रहिवाशांना त्यांचा पत्ता अद्ययावत करताना येणाऱ्या काही वास्तविक आव्हानांचा समावेश करते. हॅकाथॉनची दुसरी थीम UIDAI द्वारे दिलेल्या ओळख आणि प्रमाणीकरण अडचणींशी संबंधित आहे. या थीम अंतर्गत, UIDAI आधार क्रमांक किंवा कोणतीही जनसांख्यिकीय माहिती न शेअर करता ओळख सिद्ध करण्यासाठी अभिनव उपाय करत आहे. याव्यतिरिक्त, तो फेस ऑथेंटिकेशन एपीआय समाविष्ट असलेल्या नाविन्यपूर्ण अॅप्सचा शोध घेत आहे. एपीआय ही UIDAI द्वारे सादर केलेली नवीन प्रमाणीकरण पद्धत आहे. नागरिकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी काही विद्यमान आणि नवीन एपीआय सादर करणे हा उद्देश आहे.

 

प्रत्येक विषयातील विजेत्यांना UIDAI बक्षीस रक्कम आणि इतर आकर्षक फायद्यांद्वारे बक्षीस देईल. आधार टीमद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व तरुणांना टीम तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. कार्यक्रमाचा तपशील आणि ऑनलाईन नोंदणी फॉर्म येथे उपलब्ध आहे- https://hackathon.uidai.gov.in/


Tags: aadharaadhar hackthon 2021Narendra modiUIDAIआधारआधार हॅकेथॉन २०२१पंतप्रधान नरेंद्र मोदी
Previous Post

मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी असणाऱ्या मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ!

Next Post

पालकमंत्री यशोमती ठाकूर आमदार राणांना चिल्लगगिरी करतात असं का म्हणाल्या?

Next Post
yashomati thakur-ravi rana

पालकमंत्री यशोमती ठाकूर आमदार राणांना चिल्लगगिरी करतात असं का म्हणाल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!