Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी असणाऱ्या मुंबई मनपा कर्मचाऱ्यांना दोन वेतनवाढ!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
BMC

मुक्तपीठ टीम

मराठी भाषेतून शिक्षण घेणाऱ्यांचं पुढे भवितव्य फार नसतं असं सहजच बोललं जातं, आता मात्र अशांसाठी आशेचा किरण आहे. मराठी भाषेतून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मुंबई मनपाच्या कर्मचाऱ्यांना दोन वेतन वाढ मिळणार आहेत. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला हा निर्णय मराठी भाषिकांना सुखावणारा आहे. याचे श्रेय शिवसेनेचे दिंडोशी मतदारसंघातील आमदार सुनील प्रभू यांच्या पाठपुराव्याला जाते.

 

महापालिकेच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १००% वापर व्हावा त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना आमदार सुनील प्रभू यांच्या यशस्वी पाठपुराव्यानंतर शासनाने परिपत्रक काढण्यात आले असून लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

 

मराठी प्रोत्साहनाच्या निर्णयाचे फायदे

  • मनपाच्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेचा १००% वापर होणे आवश्यक आहे.
  • मुंबई महापालिकेचे व्यवहार जास्तीत जास्त सोप्या, सुटसुटीत आणि अर्थपूर्ण भाषेत व्हावेत आणि मराठी भाषेचा अभ्यास करण्यास प्रोत्साहन मिळाले पाहिजे.
  • वरील उद्देशांमुळे मराठी भाषा विषयांमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या मनपा कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्याबाबत मुंबई महापालिकेने ठराव मंजूर केलेला होता.
  • मात्र या निर्णयाची अंमलबजावणी २०१५ पासून पुढे बंद होती.
  • त्यामुळे त्यानंतर पदवी मिळवणारे पालिका कर्मचारी या वेतनवाढीपासून वंचित होते.
  • त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी २०१६ ते २०१८ पर्यंत पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना देखील मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार सुनील प्रभू यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे केली होती.

 

मुंबई मनपातील १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार फायदा

  • त्यांनी याबाबत निर्देशित केल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबत पुढाकार घेऊन तातडीने बैठक बोलावली.
  • त्यानंतर या प्रश्नचा आढावा घेऊन त्यांनी सकारात्मक निर्णय घेतला.
  • त्याचा फायदा मुंबई मनपातील जवळपास १ हजार ४८९ पालिका कर्मचाऱ्यांना होणार आहे.
  • या निर्णयामुळे पालिकेच्या तिजोरीवर ५२ लाख ६३ हजार रुपयांचा भार पडणार आहे.

 

पदव्युत्तर पदवी प्राप्त कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ

  • या निर्णयामुळे मराठी भाषा विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दोन अतिरिक्त वेतनवाढ देण्यात येणार आहे.
  • या पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरता कर्मचाऱ्यांनी आपला वेळ आणि पैसा खर्च केला असून, काम आणि घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून मेहनतीने शिक्षण पूर्ण केले आहे त्यामुळे माय मराठीसाठी मनपाचा ठराव क्रमांक ११६५ ची अंमलबजावणी करण्यात यायलाच हवी अशी भूमिका नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली.
  • या विषयावर गेल्या आठवड्यांत झालेल्या बैठकीनंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठक घेतल्यानंतर या विषयाची तपासणी करून आठ दिवसांत मनपा आयुक्त यांच्यासोबत चर्चा करून निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही दिली होती.
  • पुढील तीन महिन्यात याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांनी आमदार प्रभू यांना आश्वस्त केले होते.

Tags: BMCMinister Eknath ShindeShivsenasunil prabhuआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेमराठी भाषामुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई महापालिकाशिवसेनासुनील प्रभू
Previous Post

साडे बारा टक्के योजनेतील जमिनींचे वाटप येत्या दीड वर्षांत पूर्ण करण्याचा सिडकोचा मानस

Next Post

UIDAI तर्फे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘आधार हॅकेथॉन २०२१’ चे आयोजन!

Next Post
aadhar hackathon

UIDAI तर्फे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान 'आधार हॅकेथॉन २०२१' चे आयोजन!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!