मुक्तपीठ टीम
UIDAI (युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया) द्वारे २८ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘आधार हॅकेथॉन २०२१ चे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी तरुण नवकल्पनाकारांना डोळ्यांसमोर ठेवले गेले आहे, जे सध्या विविध अभियांत्रिकी संस्थांमध्ये आहेत. वास्तविक जगात पाऊल टाकण्यास जे उत्सुक आहेत. इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, हॅकेथॉन २८ ऑक्टोबरच्या मध्यरात्री सुरू होईल आणि ३१ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील.
स्वातंत्र्याचा अनोखा उत्सव
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणुन साजरे करण्याचे आवाहन केले आहे.
- हे तंत्रज्ञानातील नवकल्पना साजरे करण्याचे आणि सेवा वितरण पुढील स्तरावर नेण्याचे वर्ष आहे.
- आधारसाठी हे वर्ष देखील महत्त्वपुर्ण आहे.
- आधार नागरिकांच्या अनुभवामध्ये आणि यूआयडीएआयद्वारे प्रदान केलेल्या विविध सेवांमध्ये आणखी सुधार करण्याच्या हेतूने कार्यरत आहे.
- आधार नव्या सुधारणासोबत पुढील दशकात प्रवेश करत आहे.
आधार हॅकेथॉन २०२१ दोन थीमवर आधारित आहे. पहिला विषय नावनोंदणी आणि अद्यतनांशी संबंधित आहे, जे प्रत्यक्षात रहिवाशांना त्यांचा पत्ता अद्ययावत करताना येणाऱ्या काही वास्तविक आव्हानांचा समावेश करते. हॅकाथॉनची दुसरी थीम UIDAI द्वारे दिलेल्या ओळख आणि प्रमाणीकरण अडचणींशी संबंधित आहे. या थीम अंतर्गत, UIDAI आधार क्रमांक किंवा कोणतीही जनसांख्यिकीय माहिती न शेअर करता ओळख सिद्ध करण्यासाठी अभिनव उपाय करत आहे. याव्यतिरिक्त, तो फेस ऑथेंटिकेशन एपीआय समाविष्ट असलेल्या नाविन्यपूर्ण अॅप्सचा शोध घेत आहे. एपीआय ही UIDAI द्वारे सादर केलेली नवीन प्रमाणीकरण पद्धत आहे. नागरिकांच्या गरजा पुर्ण करण्यासाठी काही विद्यमान आणि नवीन एपीआय सादर करणे हा उद्देश आहे.
प्रत्येक विषयातील विजेत्यांना UIDAI बक्षीस रक्कम आणि इतर आकर्षक फायद्यांद्वारे बक्षीस देईल. आधार टीमद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या पहिल्याच कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सर्व तरुणांना टीम तयार करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. कार्यक्रमाचा तपशील आणि ऑनलाईन नोंदणी फॉर्म येथे उपलब्ध आहे- https://hackathon.uidai.gov.in/