Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

धनुष्यबाण शिवसेनेचाच! कायदेतज्ज्ञांशी बोलून उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
shivsena symboll

मुक्तपीठ टीम

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे समर्थक असे दोन गट पडले आहेत. आम्हचीच खरी शिवसेना असा दावा वारंवार एकनाथ शिंदे गटाकडून सुरु आहे. तसेच शिवसेनेचे निवडणूक चिन्ह ‘धनुष्यबाण’वर बंडखोर गटाकडून दावा करण्याची तयारी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज निवडणूक चिन्हाबाबत स्पष्टच बोलले आहे. ‘धनुष्यबाण’ हे निवडणूक चिन्ह शिवसेनेकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नसल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला हे सांगत आहे, “धनुष्यबाण हा शिवसेनाच राहणार!”

धनुष्यबाण हा शिवसेनाच राहील!!

  • कायद्याच्यादृष्टीने बघायला गेल्यास शिवसेनेपासून धनुष्यबाण हे चिन्ह कोणीही हिरावून घेऊ शकत नाही.
  • ती चिंता सोडा.
  • मतदानपत्रिकेवरील चिन्हाप्रमाणे लोक माणसाची चिन्हंही बघतात.
  • लोक इतका विचार करुन मतदान करतात. मी शिवसैनिकांशी बोलताना पक्षाच्या चिन्हाबाबत मागच्या काळात काय झालं होतं, हे सांगितलं.
  • पण त्याचा अर्थ आपण धनुष्यबाण हे चिन्ह सोडायचे, असा होत नाही.
  • मी घटनातज्ज्ञ आणि कायदेतज्ज्ञांशी चर्चा करून तुम्हाला हे सांगत आहे.
  • धनुष्यबाण हा शिवसेनाच राहणार.

शिवसेना ही काही वस्तू नव्हे…

  • तसेच शिवसेनेच्या भवितव्याला कोणताही धोका नाही.
  • शिवसेनेने मोठी केलेली लोकं गेली, पण ज्या लोकांनी त्यांना मोठं केलं होतं तो सामान्य मतदार शिवसेनेसोबतच आहे.
  • शिवसेना ही काही वस्तू नव्हे, कोणी घेतला आणि पळत सुटला.
  • रस्त्यावरील शिवसेना पक्ष हा अद्याप आपल्यासोबतच आहे.
  • ५० किंवा १०० आमदार गेले तरी पक्ष संपू शकत नाही.
  • पक्ष हा कायम राहतो.
  • त्यामुळे सध्या या सगळ्यावरुन लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे.
  • विधिमंडळ आणि नोंदणीकृत पक्ष हे दोन्ही वेगवेगळे असतात.

शिवसेना लढाई करण्यास तयार!!

  • परवा शिवसेना भवनात राज्यातील सर्व महिला जिल्हाप्रमुख आल्या होत्या.
  • त्या वाघिणीसारख्या बोलत होत्या.
  • ज्यांच्याकडे उत्पन्नाचं साधन नाहीये, तेही लोक येत आहेत. शिवसेनेने साध्या लोकांना मोठं केलं.
  • तोच आमच्या अभिमानाचा विषय आहे.
  • जे लोक मोठे झाले ते गेले. पण मोठ्या मानाची आणि मोठ्या हिमतीची साधी माणसं अजूनही शिवसेनेत आहेत.
  • त्यामुळे शिवसेनेला कोणी धोका पोहोचवू शकत नाही.
  • शिवसेना लढाई करण्यास तयार आहे.

Tags: ShivsenaShivsena symbollUddhav Thackerayउद्धव ठाकरेधनुष्यबाण चिन्हशिवसेना
Previous Post

आता मतदार यादी आधारशी लिंक होणार! २०२४ निवडणुकांपूर्वी होण्याची शक्यता!!

Next Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सत्तानाट्यामुळे टीव्ही 9 मराठीचं स्थान बळकट! एबीपी माझाला काहीसा फायदा, २४ तास पुन्हा घसरले!

Next Post
marathi-news-channels-rating-week-26-tv-9-marathi-no-1 again

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सत्तानाट्यामुळे टीव्ही 9 मराठीचं स्थान बळकट! एबीपी माझाला काहीसा फायदा, २४ तास पुन्हा घसरले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!