Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: सत्तानाट्यामुळे टीव्ही 9 मराठीचं स्थान बळकट! एबीपी माझाला काहीसा फायदा, २४ तास पुन्हा घसरले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
marathi-news-channels-rating-week-26-tv-9-marathi-no-1 again

तुळशीदास भोईटे / मुक्तपीठ टीम

मराठी प्रेक्षक म्हटलं की त्यांना राजकारण आवडतंच आवडतं. त्यातही पुन्हा वेगानं काही मोठं सत्तानाट्य घडू लागलं की मराठी न्यूज चॅनल्सना त्याचा फायदा होतो. सध्याच्या घडामोडींचा फायदा उचलण्यात याही आठवड्यात टीव्ही 9 मराठी न्यूज चॅनल अव्वल ठरलंय.

या वर्षाच्या २६व्या आठवड्यात मार्केट शेअरमध्ये एक टक्क्याची वाढ नोंदवत २९.३ टक्के मार्केट शेअरसह टीव्ही 9 मराठी नंबर १ आहे, दुसऱ्या क्रमांकावर घसरलेल्या झी २४ तासचा मार्केट शेअर आणखी १.२ टक्क्यांनी घसरत २५.८वर गेला आहे. एबीपी माझा ०.६ची वाढ नोंदवत तिसऱ्या, साम ०.७ ची घट नोंदवत चौथ्या आणि न्यूज 18 लोकमत ०.२ ची वाढ नोंदवत १०.७ मार्केट शेअरसह पाचव्या क्रमांकावर आहे. सहाव्या क्रमांकावरील लोकशाही न्यूज चॅनलने टेलीपोर्ट बदलला असल्याने बार्कने याही आठवड्यात त्यांचे आकडे प्रकाशित केलेले नाहीत.

पहिल्या क्रमांकावरील टीव्ही9ची कामगिरी सतत चांगली होत आहे. दुसऱ्या क्रमांकावरील झी २४ तास मात्र सतत घसरत आहे.
तिसऱ्या क्रमांकावरील एबीपी माझाची कामगिरी सतत ४ आठवडे सुधारत आहे. पण मोठ्या राजकीय घडामोडींचा विचार करता ती फक्त ०.६ म्हणजे अगदी किरकोळ सुधारलेली आहे. माझाने या आठवड्यात २१.८ टक्के मार्केट शेअर मिळवला. चौथ्या क्रमांकावरील साम ०.७ने घसरला आहे. पाचव्या क्रमांकावरील न्यूज १८ लोकमत ०.२ने किंचित पुढे गेले आहे. सहाव्या क्रमांकावरील लोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलल्यामुळे सध्या त्यांचे बार्क टीव्ही रेटिंग प्रसिद्ध केले जात नाही. ते दोन आठवड्यानंतर सुरु होण्याची शक्यता आहे.

कोणत्या न्यूज चॅनलला किती वाटा, किती घाटा?

  • हा या वर्षातील २६वा आठवडा आहे.
  • या आठवड्यात मराठी चॅनल्ससाठी खरंतर सुगीचा आठवडा होता.
  • मराठीतील सहा न्यूज चॅनल्सच्या रेटिंगमध्ये टीव्ही 9 मराठी चॅनल पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांच्यात १ टक्क्याची वाढ आहे.
  • झी २४ तास आता दुसऱ्या स्थानी आहे. मार्केट शेअर ०.८ने कमी झाला आहे.
  • तिसऱ्या स्थानावरील एबीपी माझा ०.६ने पुढे गेले आहे.
  • चौथ्या स्थानावरील साम या आठवड्यात ०.७ने मागे गेले आहे.
  • पाचव्या स्थानावरील न्यूज 18 लोकमत या आठवड्यात ०.३२ने पुढे गेले आहे.
  • सहाव्या क्रमांकावरीलोकशाहीने प्रक्षेपणाचे टेलीपोर्ट बदलले आहे. सध्या त्यांचे रेटिंग हे बार्कच्या निरीक्षणाखाली आहे. दोन आठवड्यानंतर ते प्रकाशित करणे सुरु होण्याची अपेक्षा आहे.

(खालील माहिती ही नेहमी टीव्ही रेटिंग रिपोर्टमध्ये देत आहोत. कारण हा एक प्रयत्न आहे, टीव्ही चॅनल्समध्ये कार्यरत प्रत्येकाला, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकाला टीव्ही रेटिंग समजवण्यासाठीचा…भविष्यात इतरही काही मुद्दे यात समाविष्ट करु)

समजून घ्या टीव्ही रेटिंगबद्दलची माहिती…

  • मराठी न्यूज चॅनल्समधील झी २४ तास आणि न्यूज १८ लोकमत हे पे चॅनल्स आहेत. जे पैसे भरून सबस्क्राइब करतात, त्यांनाच किंवा बुकेसोबत ते दिसतात.
  • एबीपी माझा, टीव्ही 9, साम, लोकशाही हे इतर चार चॅनल्स हे फ्री टू एअर आहेत. त्यांना पाहण्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
    झी २४ तास हे दूरदर्शनच्या फ्री डिशवर उपलब्ध असणारे एकमेव चॅनल आहे. त्यांना इतर मराठी न्यूज चॅनल्सपेक्षा २५ टक्के अधिक घरांमध्ये पोहचण्याची संधी मिळते.
  • सध्या टीव्ही रेटिंग हे चार आठवड्यांच्या सरासरी रेटिंगचं येत आहे.
  • या गुरुवारी वर्षातील १४ व्या आठवड्याचे रेटिंग आले आहे.
  • ते रेटिंग ११, १२, १३ आणि १४ अशा चार आठवड्यांच्या सरासरीचं आहे.
  • याचा अर्थ आता चॅनलना झटपट काही करून एका आठवड्याच्या कामगिरीवर मुसंडी मारणं सोपं असणार नाही.
  • चार आठवडे सातत्यपूर्ण कामगिरी करूनच पुढे झेपावता येईल.
  • या रेटिंगवरच मराठी न्यूज चॅनलचा मार्केट शेअर ठरत आहे.

(तुळशीदास भोईटे मुक्तपीठ या मुक्त माध्यमाचे संपादक आहेत. गेली ३० वर्षे प्रिंट, टीव्ही आणि आता डिजिटल माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. सध्या सोशल मीडिया प्रशिक्षण, व्यवस्थापन, राजकीय सल्ला सेवा, लेखन अशा उपक्रमांमधून मुक्तपीठसाठी आर्थिक बळ मिळवण्यातही ते सहभागी असतात.)

(आकडेवारीत किंवा अन्य माहितीत काही चूक असेल, बदल अपेक्षित असेल तर कृपया त्वरित कळवा – ९८३३७९४९६१, ७०२११४८०७०, muktpeethteam@gmail.com)

गेल्या आठवड्यात किती होते मराठी चॅनल्सचे रेटिंग?

वाचा: मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: टीव्ही 9 मराठी पुन्हा नंबर १! एबीपी माझाचीही आगेकूच सुरु!

खालील लिंक क्लिक करा आणि माहिती घ्या:

टीव्ही रेटिंगच्या घोटाळ्यानंतर तुळशीदास भोईटे यांनी सोप्या भाषेत टीव्ही रेटिंग समजवणारा व्हिडीओ केला होता.
नक्की पाहा:


Tags: ABP MajhaMarathi News Channel RatingTRPTV9एबीपी माझाटीआरपीटीव्ही 9तुळशीदास भोईटेमराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग
Previous Post

धनुष्यबाण शिवसेनेचाच! कायदेतज्ज्ञांशी बोलून उद्धव ठाकरेंनी ठासून सांगितलं!

Next Post

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको! वाहनचालकांचा खोळंबा नको!!

Next Post
Eknath Shinde

मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको! वाहनचालकांचा खोळंबा नको!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!