Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

निमित्त प्रबोधनकारांचे, संकेत ठाकरे-आंबेडकर युतीचे?

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
uddhav Thackeray and Prakash Ambedkar

मुक्तपीठ टीम

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबडेकर पहिल्यांदाच एका मंचावर आले. प्रबोधनकार डॉट कॉम या संकेतस्थळाच्या उद्घाटन कार्यक्रमानिमित्त दोन्ही नेते एकत्र आले होते. यावेळी दोन्ही नेत्यांनी आपल्या भाषणात एकमेकांचं कौतुक केले. यामुळे निमित्त जरी कार्यक्रमाचं असलं तरी आंबेडकर आणि ठाकरे यांच्या विचारांनी चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेनेतील युतीचे संकेत या दोघांकडून देण्यात आले आहेत.

आमचे वैचारिक व्यासपीठ एकच- उद्धव ठाकरे

  • माझी आणि प्रकाश आंबेडकर यांची ओळख नाही, असे नाही.
  • आम्ही बोलतो, भेटतो. पण त्यांची भेट घ्यायची म्हणजे वेळ काढून भेटायला हवं.
  • कारण माहिती आणि ज्ञान याचा धबधबा प्रकाश आंबेडकर आहेत.
  • त्यामुळे त्यांना भेटायचं म्हणजे मिनिटांचं गणित नसायला हवं.
  • आज आम्ही पहिल्यांदाच एका व्यासपीठावर आलो आहोत.
  • मात्र आमचे वैचारिक व्यासपीठ एकच आहे.
  • याच कारणामुळे एकत्र येण्यात आम्हाला अडचण आली नाही.
  • आम्ही दोन्ही विचारांचे वारसे घेऊन पुढे चालत आहोत.
  • आतापर्यंत शिवसेनेच्या प्रत्येक कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे.
  • आज मात्र त्याला कौटुंबिक रुप आले आहे.
  • आज दोन नातू एकत्र आले आहेत.

आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही!!

  • देशात सत्तेवर असलेली माणसं सत्ताधारी म्हणून नालायक आहेत.
  • केंद्र आणि राज्यात ताळमेळ नाही.
  • सगळी सत्ता आमच्या बुडाखाली हवी, असा सत्ताधाऱ्यांना मनोमन वाटतं.
  • जर कायदामंत्रीच न्यायाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील, तर सामान्यांनी काय करायचं.
  • म्हणून मला वाटतं आज आपण हुकूमशाहीकडे चाललो आहोत.
  • लोकशाहीच्या सगळ्या स्तंभांना गुलाम बनवण्याचे काम सुरु आहे.
  • आज लोकशाही टिकणार की नाही, अशी परिस्थिती आहे.
  • त्यामुळे लोकशाही टिकवण्याचा काम आपल्याला करावं लागेल, जर ते काम आपण केलं नाही तर, आपल्याला आपल्या आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं.

पंतप्रधानांनी न्यायमूर्ती नेमायचे असे त्यांना म्हणायचे आहे का? उद्धव ठाकरे

  • देशामध्ये जातीपातीच्या भिंती उभ्या करून राज्य केले जात आहे, इंग्रजांची निती चालू आहे.
  • हुकूमशाहीचे दिशेने आज कारभार सुरू आहे. संघराज्य पद्धतीने केंद्र व राज्यांना समान अधिकार आहेत.
  • पण राज्यांना डावलले जात आहे.
  • हल्लीच्या दिवसात गोमांसाच्या प्रश्नावर झुंडशाहीत बळी जातात, पण महिलेवर अमानवी अन्याय अत्याचार करणाऱ्या आरोपींचा सत्कार होतो, हे आमचे हिंदुत्व आहे काय? आदर्श कोणाला मानायचे, असा प्रश्नही ठाकरे यांनी केला.
  • गोमांस खाणार असे म्हणणारे केंद्रीय मंत्री रिजीजू हे न्यायमूर्तीची निवड करणाऱ्या कॉलेजियमविषयी प्रश्नचिन्हे निर्माण करतात.
    पंतप्रधानांनी न्यायमूर्ती नेमायचे असे त्यांना म्हणायचे आहे का?

राजेशाहीच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज हे एकमेव क्षत्रिय- प्रकाश आंबेडकर

  • प्रबोधनकार ठाकरे यांचे ग्रंथरूपातील विचार जो वाचेल त्याला आजच्या परिस्थितीत सामाजिक, राजकीय आणि धार्मिक धक्काही बसेल.
  • देशातील हजारो वर्षांची गुलामगिरी प्रबोधनकारांनी तीन वाक्यात नमूद केली.
  • मनुस्मृतीच्या व्यवस्थेला प्रबोधनकारांनी दोष दिला होता.
  • राजेशाहीच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराज हे एकमेव क्षत्रिय होते.
  • या देशात वैदिक परंपरा की संताची परंपरा असे द्वंद आहे.
  • आम्ही कुठे पाहिजे याबाबत प्रबोधनकारांनी वैदिक परंपरेवर आसूड ओढले.
  • धर्म हा आवश्यक आहे.
  • महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी या तिघांचे भांडण धर्माशी नव्हते.
  • तर त्या धर्मांनी उभ्या केलेल्या समाजव्यवस्थेशी होते.
  • त्यात सुधारणा करणारी मांडणी प्रबोधनकारांनी केली.
  • समता, बंधुभाव या दोन्हींचा बळी जाता कामा नये, अशी त्यांची मांडणी होती.


Tags: Prabodhankar.ComPrakash AmbedkarShivsenaUddhav ThackerayVBAउद्धव ठाकरेप्रकाश आंबेडकरप्रबोधनकार डॉट कॉमवंचित बहुजन आघाडीशिवसेना
Previous Post

स्टील अथॉरिटी ऑफ इंडियात विविध पदांवर २५७ जागांसाठी करिअर संधी

Next Post

पुण्याच्या नवले पुलावर ४८ वाहनांचा अपघात! वाचा महामार्गावरील अपघात कसे टाळावे…

Next Post
Accident of 48 vehicles on Navale bridge of Pune

पुण्याच्या नवले पुलावर ४८ वाहनांचा अपघात! वाचा महामार्गावरील अपघात कसे टाळावे...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!