मुक्तपीठ टीम
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि ट्विटरचे नवे बॉस एलॉन मस्क हे त्यांच्या वेगवान आणि धक्कादायक निर्णयांसाठी ओळखले जातात. ट्विटर विकत घेतल्यानंतर त्यांनी अनेक झटपट निर्णय घेतले आहेत. या क्रमवारीत, आता त्यांनी नवीन धोरण जाहीर केलं आहे.
आठवड्यातील ७ दिवस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करा!
- मस्क यांनी कर्मचाऱ्यांना आठवड्यातील सातही दिवस १२ तासांच्या शिफ्टमध्ये काम करण्याचे निर्देश दिले आहेत.
- असे न केल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते.
- एलॉन मस्क यांनी ट्विटर कर्मचार्यांना दिलेली मुदत आणि त्यांच्या आक्रमक कामाच्या धोरणानुसार हे करण्यात आले आहे.
- कर्मचाऱ्यांनी ओव्हरटाईम, शिफ्टच्या वेळा, अतिरिक्त वेतन, भत्ते आणि नोकरीची सुरक्षा आदींबाबत चर्चा न करता आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे.
अभियंता गमावू शकतात नोकरी!!
- अहवालानुसार, अभियंत्यांना नोव्हेंबरच्या सुरुवातीची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
- जर कर्मचारी टर्नअराउंड आवश्यकता पूर्ण करू शकले नाहीत तर ते त्यांच्या नोकऱ्या गमावू शकतात.
- अभियंत्यांसाठी नोव्हेंबरच्या सुरुवातीस टास्क पूर्ण करणे हे ट्विटरवर त्यांच्या करिअरसाठी एक नवे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.