मुक्तपीठ टीम
ट्विटर म्हणजे कमी शब्दांमध्ये अभिव्यक्त जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्याची संधी देणारी मायक्रो ब्लॉगिंग साइट. सध्याच्या स्पर्धेच्या काळाता ट्विटरही बदलत आहे. तरुणाईमधील इंस्टाग्राम या प्रतिस्पर्धी मेटा समुहातील फोटो ब्लॉगिंग साइटची लोकप्रियता ट्विटरच्या टीमनेही अभ्यासली असावी. त्यातूनच आता इस्टाग्रामसारखे काही फिचर्स ट्विटरवरही देण्यात येणार आहे.
ट्विटरच्या नवीन अपडेटमध्ये इंस्टाग्रामसारखे फीचर उपलब्ध होणार आहेत
- कालांतराने ट्विटर लोकांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे.
- हे लक्षात घेऊन कंपनी दररोज नवनवीन अपडेट्स सादर करत असते.
- अलीकडे, यूजर्सचा अनुभव आणखी सुधारण्यासाठी, कंपनी त्यावर ट्विटर सर्कल फिचर देखील जोडणार आहे.
ट्विटर सर्कल फिचर कसं कार्य करणार?
ट्विटरचे हे नवीन फीचर अशा लोकांना खूप आवडेल ज्यांना त्यांची प्रायव्हसी आवडते. ट्विटरचे हे नवीन फीचर इंस्टाग्रामच्या क्लोज फ्रेंड फीचरसारखे आहे. हे फिचर वापरून ट्विट्सवर मर्यादा सेट करता येते. यामुळे ट्विट फक्त निवडलेल्या लोकांनाच दिसतील, निवडलेल्या लोकांशिवाय आणि इतर कोणीही तुमचे ट्विट्स पाहू शकणार नाही.
ट्विटर सर्कल फिचर लवकरच उपलब्ध होणार
- कंपनीने सर्वांसाठी ट्विटर सर्कल फीचर जारी केले आहे.
- परंतु तरीही, हे फीचर येण्यास थोडा वेळ लागेल.
- या नवीन फिचरचा वापर करून १५० लोकांपर्यंत निवडू शकता आणि फक्त तेच तुमचे ट्विट आणि पोस्ट पाहतील.
- या फिचरचा वापर करून फॉलोअर्सच्या यादीबाहेरील लोकही निवडू शकता.