Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

बरेच तास बसून? एक पाकिट सिगारेट ओढण्‍याइतकंच घातक! वाचा डॉक्टरांचा सल्ला!

July 26, 2021
in featured, आरोग्य
0
health

डॉ. विवेक महाजन / आरोग्य

तुम्‍हाला माहित आहे का, सलग बरेच तास बसून राहिल्‍याने उच्‍च रक्‍तदाब होऊ शकतो आणि कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचा धोका वाढू शकतो? खरेतर, डेस्‍कसमोर, दुचाकीवर किंवा स्क्रिनसमोर अशा कोणत्‍याही स्थितीमध्‍ये तासनतास बसून राहणे घातक ठरू शकते.

 

आपण बसतो तेव्‍हा उभे राहणे किंवा चालण्‍याच्या तुलनेत कमी ऊर्जेचा वापर करतो. संशोधनातनू निदर्शनास आले आहे की, बरेच तास बसून राहिल्‍याने विविध आरोग्‍यविषयक आजार होतात. यामध्‍ये लठ्ठपणासह इतर आजार जसे हाय ब्‍लड शुगर, कमरेच्‍या भोवती जादा चरबी आणि असामान्‍य कोलेस्‍ट्रॉल पातळ्या यांचा त्रास होतो. बरेच तास बसून राहिल्‍यामुळे कार्डियोव्‍हॅस्‍कुलर आजार व कर्करोगामुळे मृत्‍यू होण्‍याचा धोका देखील वाढतो.

 

बरेच तास बसून राहणे व आरोग्‍यविषयक आजारांचा धोका यांमधील संबंध समजून घेण्‍यासाठी करण्‍यात आलेल्‍या विविध अभ्‍यासांमधून निदर्शनास आले की, कोणत्‍याही शारीरिक हालचालींशिवाय दिवसातून आठ तासांपेक्षा अधिक काळ बसून राहणाऱ्या व्‍यक्‍तींना लठ्ठपणा किंवा धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्‍यूचा धोका समान होता. म्‍हणूनच, बैठेकाम करण्‍याची जीवनशैली तुमच्‍या आरोग्‍यासाठी घातक ठरू शकते. दिवसादरम्‍यान कमी वेळ बसणे किंवा काम करताना काही वेळ उताणी पडणे अशा गोष्‍टींमुळे जीवन आरोग्‍यदायी राहू शकते. आम्‍हाला माहित आहे की, महामारीमुळे बहुतांश लोक त्‍यांच्‍या घरांमध्‍येच आणि घरातूनच काम करत असल्‍यामुळे अधिक वेळ काम करावे लागत असून बरेच तास स्क्रिन्‍ससमोरच बसून राहावे लागत आहे. पण यामुळे आरोग्‍यावर अनेक प्रतिकूल परिणाम होतात.

 

बरेच तास बसून राहिल्‍याने शरीरावर काय परिणाम होतात?

मनुष्‍यजातीची रचना ताठ उभे राहण्‍यासाठी निर्माण करण्‍यात आली आहे. आपले हृदय व कार्डियोव्‍हॅस्‍कुलर यंत्रणा त्‍यानुसार अधिक कार्यक्षमपणे कार्य करतात. आपण ताठ राहिल्‍यास आपल्‍या आतड्यांचे कार्य देखील अधिक कार्यक्षमपणे होते. हॉस्पिटलमध्‍ये अंथरूणाशी खिळून राहिलेल्‍या लोकांमध्‍ये त्‍यांच्‍या आतड्यांच्‍या कार्यामध्‍ये समस्‍या निर्माण होणे हे सामान्‍य आहे, नाही का? याप्रमाणेच दीर्घकाळापर्यंत बसून राहणे किंवा हालचाल न करणे आरोग्‍यासाठी अत्‍यंत घातक ठरू शकते.

 

पाय आणि ग्‍लुटेल्‍स (नितंबामधील स्‍नायू): बराच वेळ बसून राहिल्‍याने पाय व ग्‍लुटेलमधील मोठे स्‍नायू कमकुवत होऊन त्‍यांचे नुकसान होऊ शकते. हे मोठे स्‍नायू चालण्‍यासाठी आणि स्थिर उभे राहण्‍यासाठी महत्त्वाचे आहेत. हे स्‍नायू कमकुवत असतील तर आपल्‍याला पडल्‍यामुळे आणि व्‍यायामामुळे दुखापत होण्‍याची अधिक शक्‍यता आहे.

 

चयापचय समस्‍यांमुळे हृदयविषयक आजार व हृदयाघात: स्‍नायूंच्‍या हालचालीमुळे आपण सेवन करत असलेले मेद व शर्करांचे पचन होण्‍यामध्‍ये मदत होते. बराच वेळ बसून राहिल्‍याने पचनशक्‍तीवर परिणाम होतो, ज्‍यामुळे शरीरामध्‍ये मेद व शर्करा तसेच राहतील.

 

नितंब व सांध्‍यांच्‍या समस्‍या: बराच वेळ बसून राहिल्‍यामुळे हिप फ्लेक्‍झर स्‍नायू कमकुवत होतो, ज्‍यामुळे नितंबाच्‍या सांध्‍यांमध्‍ये समस्‍या निर्माण होऊ शकतात. बराच वेळ बसून राहिल्‍याने, विशेषत: अयोग्‍य बसण्याची स्थिती किंवा योग्‍यरित्‍या डिझाइन न केलेली खुर्ची किंवा वर्कस्‍टेशनमध्ये बसून राहिल्‍याने पाठीसंबंधित समस्‍या देखील होऊ शकतात. तुम्‍ही व्‍यायाम करत असाल, पण बराच वेळ बसून राहत असाल तरीदेखील तुम्‍हाला मेटॅबोलिक सिंड्रोम सारखे आरोग्‍यविषयक आजार होण्‍याचा धोका आहे.

 

कर्करोग: नवीन अभ्‍यासांचा सल्‍ला आहे की, बराच वेळ बसून राहिल्‍याने कर्करोगाचे काही प्रकार जसे फुफ्फुसाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग व कोलन कर्करोग होण्‍याचा धोका वाढतो.

 

कामकाजाच्‍या वेळी सक्रिय व आरोग्‍यदायी कसे राहावे?

तुम्‍ही शारीरिकदृष्‍ट्या सक्रिय आहात तर तुमच्‍यामधील ऊर्जा पातळ्या व सहनशक्‍ती सुधारते आणि हाडे बळकट राहतात. शक्‍य असेल तर काही वेळ उभे राहा किंवा काम करताना चालण्‍याचा प्रयत्‍न करा.

  • दर ३० मिनिटांनी बसण्‍याच्‍या स्थितीमधून काहीसा ब्रेक घ्‍या.
  • फोनवर बोलताना किंवा टेलिव्हिजन पाहताना उभे राहा.
  • डेस्‍कवर काम करत असाल तर स्‍टॅण्डिंग डेस्‍क निवडा किंवा उंच टेबल किंवा काऊंटरसह सुधारणा करा.
  • तुमच्‍या कामाचे साहित्‍य ट्रेडमिलवर ठेवा जसे कम्‍प्‍युटर स्क्रिन व कीबोर्ड स्‍टॅण्‍डवर किंवा विशेषीकृत ट्रेडमिल-रेडी व्‍हर्टिकल डेस्‍कवर ठेवा, ज्‍यामुळे तुम्‍हाला दिवसभर हालचाल करता येऊ शकते.

 

हालचाल किंवा रमतगमत केलेल्‍या हालचालीचा परिणाम देखील उत्तम ठरू शकतो. ही सुरूवात केल्‍यास तुमच्‍या शरीरातील अधिक कॅलरीज निघून जातील. ज्‍यामुळे वजन कमी होऊन ऊर्जा पातळ्या वाढू शकतात. तसेच शारीरिक व्‍यायामामुळे स्‍नायूंची शक्‍ती कायम राखण्‍यामध्‍ये मदत होते, परिणामत: मानसिक आरोग्य उत्तम राहते.

Dr vivek mahajan

(डॉ. विवेक महाजन हे कल्‍याण येथील फोर्टिस हॉस्पिटलमधील इंटरवेन्‍शनल कार्डियोलॉजीसाठी कन्‍सल्‍टण्‍ट आहेत.)

 

सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर…वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!


Tags: Dr vivek mahajanfortis hospitalhealthडॉ. विवेक महाजनडॉक्टरांचा सल्लाफोर्टिस
Previous Post

“धोकादायक डोंगरांवरील गावांचे सर्वेक्षण करून पुनर्वसन करा”: रामदास आठवले

Next Post

शोभा करंदलाजेंच्या मोदी मंत्रिमंडळात समावेशानं नक्की झाला होता येडियुरप्पांचा राजीनामा!

Next Post
b.s.yediyurappa

शोभा करंदलाजेंच्या मोदी मंत्रिमंडळात समावेशानं नक्की झाला होता येडियुरप्पांचा राजीनामा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!