Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

शेतकऱ्यांनी नाकारलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत ठरली पुढची बैठक

शेतकऱ्यांचा मान राखत 'मान' यांनी समिती सोडली, घनवट समितीत 'घट्ट'

January 20, 2021
in घडलं-बिघडलं
0
kissan aandolan

मुक्तपीठ टीम

 

नवीन कृषी कायद्यांबाबत सुरू असलेला वाद मिटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने गठित केलेल्या समितीची पहिली बैठक आज पार पडली आहे. आज या बैठकीत पुढची बैठक २१ जानेवारीला घेण्याचे उरलेल्या तीन सदस्यांनी ठरवले. जे शेतकरी नेते येतील त्यांना सहभागी करून, जे येऊ शकणार नाहीत त्यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगने जोडून चर्चा केली जाईल. सरकारची तयारी असेल तर सरकारी प्रतिनिधींशीही चर्चा करण्यात येणार आहे.

एका सदस्याची आधीच समितीतून माघार

कोर्टाने १२ जानेवारी रोजी ४ सदस्यीय समिती नेमली होती. भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपेंद्रसिंग मान, आंतरराष्ट्रीय धोरण तज्ज्ञ डॉ. प्रमोद कुमार जोशी, कृषी अर्थशास्त्रज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील अनिल घनवट यांची नावे या समितीत आहेत.

समितीच्या सदस्यांची नावे जाहीर होताच शेतकऱ्यांनी ही समिती सरकारलाच पाठिंबा देणारी समिती आहे असे म्हटले. हा वाद वाढल्यानंतर भूपेंद्रसिंग मान यांनी त्यांचे नाव मागे घेतले.

 

शेतकऱ्यांचा ‘मान’ राखत समितीतून ‘मान’ बाहेर!

भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष भूपिंदर सिंह म्हणाले होते की, “मला या चार जणांच्या समितीत स्थान देण्यात आले, त्यासाठी मी सर्वोच्च न्यायालयाचा आभारी आहे. पण, शेतकरी आणि संघटनेचा नेता असल्याने मी सर्वसाधारण लोक आणि शेतकर्‍यांच्या मनात असलेल्या भीतीमुळे मी समितीतून बाहेर पडत आहे. मी पंजाब आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी तडजोड करू शकत नाही. यासाठी मी कोणत्याही पदाचा त्याग करेन आणि पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत कायम उभा राहीन.”

घनवट मात्र समितीत घट्ट!
एकीकडे भूपिंदर सिंह यांनी शेतकऱ्यांच्या भावनांचा मान राखत समिती सोडली आहे, तर आपल्या महाराष्ट्रातील दिवंगत शरद जोशींच्या शेतकरी संघटनेचे अनिल घनवट मात्र समितीला घट्ट पकडून बसले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने नवीन सभासद नेमला नाही तर विद्यमान सदस्य त्यांचे काम करतील. आम्हाला कोर्टाकडून काय करावे याबद्दल माहिती मिळाली आहे. त्यानुसार आम्ही २१ जानेवारीपासून त्यावर काम सुरू करू. त्याचे धोरण आखण्यासाठी मंगळवारी बैठक घेण्यात येत आहे, असे अनिल घनवट यांनी माध्यमांना सांगितले आहे.


Tags: anil ghanwatBhupinder Singh MannFarmerFarmer Delhi Protestsuprem courtअनिल घनवटभूपेंद्रसिंग मानसर्वोच्च न्यायालयसर्वोच्च न्यायालय समिती
Previous Post

मुंबई-पुणे-मुंबई…मुलांची खरेदी-विक्री, डॉक्टरही साथीदार!

Next Post

वांद्रे येथून ७३ लाख रुपयांच्या ड्रग्जसह महिलेस अटक

Next Post
drugs seized

वांद्रे येथून ७३ लाख रुपयांच्या ड्रग्जसह महिलेस अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!