Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वांद्रे येथून ७३ लाख रुपयांच्या ड्रग्जसह महिलेस अटक

कारवाईत एमडी, चरससह रोख रक्कम हस्तगत

January 19, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
drugs seized

मुक्तपीठ टीम

मुंबई आणि उपनगरात एमडी आणि चरसची विक्री करणार्‍या एका महिलेस घाटकोपर युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाच्या अधिकार्‍यांनी अटक केली. नजमा अहमद शेख असे या महिलेचे नाव असून तिच्याकडून पोलिसांनी ७३ लाख रुपयांचा एमडी, चरस आणि रोख रक्कम हस्तगत करण्यात आली आहे. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी तिच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून याच गुन्ह्यांत तिला स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

मुंबई शहरात ड्रग्ज विक्री करणार्‍या अनेक टोळ्या कार्यरत असून या टोळीकडून त्यांच्या हस्तकाच्या मदतीने ड्रग्जची तस्करी केली जाते, त्यामुळे अशा ड्रग्ज तस्कराविरुद्ध विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश वरिष्ठांकडून सर्वच युनिटच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला देण्यात आले होते, या आदेशांनतर पोलिसांनी अशा ड्रग्ज तस्काराची माहिती काढून त्यांच्या अटकेसाठी शोधमोहीम सुरु केली होती, ही शोधमोहीम सुरु असतानाच वांद्रे परिसरात एमडी ड्रग्जची खरेदी विक्री होणार असल्याची माहिती घाटकोपर युनिटच्या अधिकार्‍यांना मिळाली होती, या माहितीची शहानिशा करण्यासाठी सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र चिखले यांच्या मार्गदर्शनाखाली लता सुतार, पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोबडे, पोलीस हवालदार यादव, दरगडे, पोलीस नाईक चौरे, पोलीस शिपाई शेगावकर, महाले, महिला पोलीस शिपाई डुंबरे, पोलीस हवालदार चालक वाघ यांनी बीईएसटी इलेक्ट्रीक पोल क्रमांक एचएजे/०९४/१६७ जवळ, पटवर्धन गार्डन गेटसमोरील लिंकींग रोड, वांद्रे परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. शुक्रवार १५ जानेवारीला तिथे नजमा शेख ही महिला आली होती, तिची हालचाल संशयास्पद वाटताच तिला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले, तिची अंगझडतीत घेतल्यांनतर पोलिसांना दहा लाख रुपयांचे शंभर ग्रॅम वजनाचे एमडी ड्रग्ज आणि वीस हजार रुपयांची कॅश जप्त केली.

 

हा मुद्देमाल ताब्यात घेतल्यानंतर तिच्याविरुद्ध पोलिसांनी एनडीपीएस कलमांतर्गत गुन्हा नोंदविला होता, याच गुन्ह्यांत तिला अटक करुन नंतर तिला महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी तिला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली होती. तपासात नजमा ही माहीम येथील माहीम डेपो, जनता सेवक सोसायटीमध्ये राहत असल्याचे उघडकीस आले. पोलीस कोठडीत तिची चौकशी केली असता तिने कुर्ला येथे भाड्याने एक फ्लॅट घेतल्याचे सांगितले, या फ्लॅटमध्येच ती ड्रग्जची साठवणूक करीत होती, त्यानंतर तिच्या चौकशीनंतर रविवारी पोलिसांनी कुर्ला येथील एलबीएस मार्ग, मानवदृष्टी सोसायटीच्या बी विंगच्या फ्लॅट क्रमांक ७०५ मध्ये छापा टाकला होता, या छाप्यात पोलिसांनी ५४ लाख रुपयांचा २ किलो ७०० ग्रॅम वजनाचे चरस आणि ९ लाख ४५ हजार रुपयांची कॅश असा ६३ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. दोन्ही कारवाईत पोलिसांनी शंभर ग्रॅम वजनाचे एमडी, २ किलो ७०० ग्रॅम वजनाचे चरस आणि ७ लाख ६५ हजार रुपयांची कॅश असा ७३ हजार ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नजमा ही ड्रग्ज तस्करीतील रेकॉर्डवरील आरोपी असून तिने मुंबईसह उपनगरात यापूर्वी ड्रग्ज तस्करी केल्याचे उघडकीस आले आहे. याच गुन्ह्यांत तिची पोलिसांकडून चौकशी सुरु असून तिचे इतर कोणी सहकारी आहेत, तिने ते ड्रग्ज कोठून आणले, ते ड्रग्ज कोणाला विकले याचा पोलीस तपास करीत आहेत. या गुन्ह्यांचा पोलीस उपनिरीक्षक खंडेराव बोबडे हे तपास करीत असल्याचे सांगण्यात आले.


Tags: Drugsdrugs seizedkayada policeकायदा पोलीसड्रग्ज जप्त
Previous Post

शेतकऱ्यांनी नाकारलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत ठरली पुढची बैठक

Next Post

टीम इंडियाचे संयमी शौर्य…वेदना सहन करत चेतेश्वर पुजारी लढला!

Next Post
cheteshwar

टीम इंडियाचे संयमी शौर्य...वेदना सहन करत चेतेश्वर पुजारी लढला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!