Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई-पुणे-मुंबई…मुलांची खरेदी-विक्री, डॉक्टरही साथीदार!

अनेक नवजात मुलांची साठ हजार ते तीन लाखांना विक्री केल्याचे उघड

January 20, 2021
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Infant sell racket

मुक्तपीठ टीम
मुंबई शहरात कार्यरत असलेल्या नवजात बालकांच्या खरेदी-विक्री करणार्‍या टोळीचा गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या युनिट एकच्या अधिकार्‍यांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी वेगवेगळ्या परिसरातून सात महिलांसह दोन पुरुष अशा नऊजणांना पोलिसांनी अटक केली असून त्यात एका डॉक्टरसह महिला टेक्नीशियन आणि महिला दलालांचा समावेश आहे. गितांजली सचिन गायकवाड, रुक्सार मोहम्मद शकील शेख, शहाजहान शौकत जोगीलकर, रुपाली शंकर वर्मा, संजय शांताराम पंडम, गुलशन खान, निशा अहिरे, आरती हिरामणी सिंग, डॉ. धनजंय मोगा अशी या नऊजणांची नावे आहेत. या टोळीने आतापर्यंत मुंबईसह पुण्यात काही नवजात बालकांची साठ हजार आणि तीन लाख रुपयांमध्ये विक्री केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघडकीस आली आहे.
अटकेनंतर या सर्व नऊ आरोपींना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. वांद्रे येथील संत ज्ञानेश्‍वर नगर, सम्राट चाळीत रुक्सार शेख नावाची एक महिला राहते, तिने अलीकडेच सांताक्रुज येथील व्ही एन देसाई रुग्णालयात एका मुलाला जन्म दिला होता, या मुलाची नंतर तिने विक्री केली आहे. अशाच प्रकारे तिने यापूर्वी एका मुलीला जन्म दिला होता, या मुलीचीही तिने विक्री केली होती, इतकेच नव्हे तर याच परिसरात राहणार्‍या शहाजहान जोगीलकर या महिलेने दिड वर्षांपूर्वी एका मुलाला जन्म दिला होता, तिनेही रुक्सारप्रमाणे तिच्या मुलाची विक्री केली होती.
ही माहिती वरिष्ठांना सांगितल्यानंतर त्यांनी त्याची गंभीर दखल घेत या संपूर्ण प्रकरणाची योग्य ती शहानिशा करुन संबंधित आरोपीविरुद्ध योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश युनिट एकला दिले होते. या आदेशानंतर सहपोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, अतिरिक्त पोलीस आयुक्त विरेश प्रभू, पोलीस उपायुक्त प्रकाश जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त शशांक सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनंत शिंदे, जयेश ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक जगताप, मुठे, सुनिल तावडे, महिला पोलीस उपनिरीक्षक मनिषा पवार, सहाय्यक फौजदार तानाजी मोरे, आप्पा हुनगीनाळे, अशोक मोहिते, पोलीस हवालदार श्रीधर भोईटे, संतोष शेलार, जितेंद्र शेडगे, पोलीस नाईक सुनिल सोहनी, प्रकाश माने, सुनिल मैड, नाना गोडे, रमेश मदने, शैलेश शिंदे, संदीप सुपे, नितीन तायडे, नितीन तुपे, विनोद भादले, गोरक्षनाथ घुगे, संतोष लोखंडे, पोलीस शिपाई नागेश तोरणे, अमोल वैर्‍हाडी, महिला पोलीस हवालदार साठे, डोईफोडे, डुंबरे, चव्हाण यांनी तपासाला सुरुवात केली होती.

मुंबईसह पुण्यात बालकांची विक्री

या पथकाने व्ही. एन देसाई रुग्णालयात जाऊन चौकशी केली असता १ डिसेंबर २०२० रोजी रुक्सार शेख हिची प्रसुती झाली होती, तिने एका मुलाला जन्म दिला होता. या माहितीनंतर पोलिसांनी संत ज्ञानेश्‍वर नगरात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी रुक्सार ही तिच्या आईसोबत राहत असून तिने तिच्या मुलाची विक्री केल्याची कबुली दिली. तिच्यासोबत शहाजहान हिनेदेखील तिचा मुलगा धारावी येथे राहणार्‍या संजय शांताराम पंडम याला विकल्याचे सांगितले. शहाजहानच्या चौकशी तिने या वृत्ताला दुजोरा देताना तिचे मुल तिने साठ हजार रुपयांना विकल्याचे सांगितले. याकामी रुक्सार आणि शहाजहान हिला रुपाली वर्मा, गुलशन खान, निशा अहिरे आणि इतरांनी मदत केली होती. नवजात बालकांची विक्री करणारी एक टोळी असून या टोळीत ते सर्वजण एजंट म्हणून काम करीत होते. या टोळीने मुंबईसह पुणे शहरात या नवजात बालकांची विक्री केल्याचे तपासात सांगितले. हा प्रकार उघडकीस येताच गुन्हे शाखेकडून खेरवाडी पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली होती, या तक्रारीनंतर त्यांच्याविरुद्ध ३७० (४), ३४ भादवी सहकलम ८१ ज्युवेनाईल जस्टीम कलमार्ंतत गुन्हा नोंदविला होता, या गुन्ह्यांचा तपास नंतर गुन्हे शाखेकडे स्वतकडे घेतला होता.

लॅब टेक्निशियनचीही टोळीला मदत

या चौकशीनंतर १४ जानेवारीला रुक्सार, शहाजहान, रुपाली वर्मा, संजय पंडमसह चौघांना, दुसर्‍या दिवशी निशा अहिरे, गुलशन खान अशा सहाजणांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर या सर्वांना स्थानिक महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी त्यांना न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. याच गुन्ह्यांत गितांजली गायकवाड आणि आरती सिंग हिचा सहभाग उघडकीस आला होता, आरती ही सांताक्रुज येथे राहत असून एका पॅथोलॉजी लॅबमध्ये टेक्शीनियन म्हणून काम करते. तिची गुन्हे शाखेच्या कार्यालयात चौकशी केली असता तिचा या गुन्ह्यांत सहभाग उघडकीस आला होता, त्यामुळे तिला पोलिसांनी अटक केली.

वरळीचा डॉक्टरही टोळीचा साथीदार! मुलामागे ३० हजाराची कमाई!

या आरोपींच्या चौकशीतून रुक्सार आणि शहानहान यांनी त्यांच्या तीन मुलांची प्रत्येकी साठ हजार, दिड लाख आणि तीन लाखांना विकले होते, या बालकांची रुपाली वर्मा, गुलशन खान, निशा अहिरे यांनी पुणे आणि मुंबईत विक्री केली होती. या टोळीला डॉ. धनंजय मोगा यांनी मदत केल्याचे उघडकीस आले होते, डॉ. मोगा यांचे वरळी येथे एक खाजगी क्लिनिक असून त्यांनी एका नवजात मुलाची विक्रीसाठी या टोळीला मदत केली होती, त्यामोबदल्यात त्यांना तीस हजार रुपये मिळाले होते, तपासात हा प्रकार उघडकीस येताच सोमवारी डॉ. मोगा यांना पोलिसांनी अटक केली. याच गुन्ह्यांत सर्व आरोपी सध्या गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत असून त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या टोळीने आतापर्यंत किती मुलांची विक्री केली आहे, त्या मुलांना कोणाकोणाला दिले आहे, त्यांच्याकडून किती रुपये घेतले होते, या टोळीचा नवजात बालकांच्या खरेदी-विक्री करणार्‍या आंतरराष्ट्रीय टोळीशी काहीही संबंध आहे का,  याचा आता पोलिसांकडून तपास सुरु आहे.


Tags: infant sell racketmumbaimumbai policepuneपुणेमुंबईमुंबई पोलीसमुले विकणारी टोळी
Previous Post

धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा महिला मोर्चाचे आंदोलन

Next Post

शेतकऱ्यांनी नाकारलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत ठरली पुढची बैठक

Next Post
kissan aandolan

शेतकऱ्यांनी नाकारलेल्या समितीच्या पहिल्या बैठकीत ठरली पुढची बैठक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!