Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

छोट्या प्रवासासाठी टियाची मेड इन इंडिया मोंत्रा ई-बायसिकल्स

September 6, 2026
in लेटेस्ट टेक
0
tia montra-bicycles

मुक्तपीठ टीम

मोंत्रा या टीआय सायकल्स ऑफ इंडियाच्या हाय-एण्ड परफॉर्मन्स बाइक ब्रॅण्डने आपली पहिली इलेक्ट्रिक बाइक बाजारात आणली आहे. छोट्या अंतराचे प्रवास आरामदायी व सोयीस्कर करण्याच्या उद्देशाने ही बाइक खास डिझाइन करण्यात आली आहे. दैनंदिन प्रवासासाठी ई-बायसिकल्स हे परवडण्याजोगे व प्रभावी साधन ठरावी म्हणून या बाइकची किंमत २७ हजार २७९ रुपये एवढी ठेवण्यात आली आहे. ही बाइक बाजारात आणून, सार्वजनिक वाहतुकीसाठी वाट बघत थांबण्यातील गैरसोय तसेच छोट्या अंतरांचे प्रवास करताना पार्किंगसाठी जागा शोधणे आदी समस्या सोडवण्यास मदत होणाराय.

 

मोंत्रा ई-बायसिकल हलक्या वजनाच्या मिश्रधातूच्या (अलॉय) फ्रेमवर घडवण्यात आली आहे आणि त्यामुळे ती हालचालीसाठी सोपी आहे.
ड्युअल मोडमुळे वापरकर्ता त्याच्या सोयीप्रमाणे मॅन्युअल व इलेक्ट्रिक मोड वापरू शकतो. इलेक्ट्रिक ब्रेकिंग प्रणालीच्या तरतुदीमुळे ब्रेकिंग प्रभावी व सहज झाले आहे. कारण, ब्रेक वापरल्यानंतर मोटर पॉवर खंडित होते.

 

कोरोना साथीमुळे अनेकांच्या मनात सार्वजनिक वाहतूक साधने वापरण्याबद्दल भीती आहे आणि त्यामुळे अगदी छोट्या अंतरांसाठीही ते स्वत:ची खासगी वाहने वापरतात. मात्र, वाहतूक आणि पार्किंगची परिस्थिती बघता, हा फारसा व्यवहार्य पर्याय नाही. मोंत्राने हे लक्षात घेतले आणि छोट्या अंतरावरील प्रवासाची मागणी पूर्ण करण्यासाठी स्वत:ची ई-बायसिकल खास डिझाइन केली. ई-बायसिकल चालवण्याचा सरासरी खर्च ७ पैसे प्रति किलोमीटर असतो. त्याचप्रमाणे ही बाइक वापरल्यास कार्बन उत्सर्जनातील व्यक्तीचे योगदान लक्षणीयरित्या कमी होते तसेच अखेरच्या उपभोक्त्यासाठी (एण्ड कंझ्युमर) प्रतीक्षा कालावधी (सार्वजनिक वाहतूक साधनांसाठी, इंधन भरण्यासाठी) अनेक तासांनी कमी होतो.

 

ट्युब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक वेलायन सुबैया मोंत्रा ई-बायसिकल्सच्या लाँचबद्दल म्हणाले, “आपल्यापैकी बहुतेकांसाठी छोट्या अंतरावरील प्रवासाचा विभाग हा सार्वजनिक वाहतुकीच्या निवडीवर व उपलब्धतेवर अवलंबून असतो. मोंत्रा ई-बायसिकल्स बाजारात आणून आम्हाला आमच्या ग्राहकांना प्रतीक्षा कालावधीतून स्वतंत्र करायचे आहे. या बाइक्समुळे ते स्वत:ला हवे तेथे हवे तेव्हा जाऊ शकतात. वाहतुकीचे भवितव्य इलेक्ट्रिक हेच असल्यामुळे ई-बायसिकल हे शहरी प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीचे वाहतूक साधन होणार आहे. भारतातील ई-सायकल्सची बाजारपेठ २०२६ पर्यंत १२.६९ टक्के सीएजीआरसह २.०८ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सपर्यंत वाढणे अपेक्षित आहे, असे एका अलीकडेच झालेल्या अभ्यासातून दिसून आले आहे. ही संभाव्यता लक्षणीयरित्या प्रचंड आहे आणि तिचा फारसा उपयोग करण्यात आलेला नाही. एक ब्रॅण्ड म्हणून मोंत्रा नेहमीच ग्राहककेंद्री राहिला आहे. भारतात सायकलमध्ये कार्बन फ्रेम सर्वप्रथम वापरण्यापासून ते जलद, सुरळीत व अधिक सोप्या वाहतुकीसाठी सायकलचे वजन कमी करण्यापर्यंत अनेक प्रयोग मोंत्राने केले आहेत. आमच्या नवीन मोंत्रा ई-बायसिकल्स उत्पादनामुळे ग्राहकांचा परिवार आणखी विस्तारेल, अशी खात्री आम्हाला आहे. छोट्या अंतराचा दैनंदिन प्रवास दर्जेदार करण्याची इच्छा असलेले आमच्या ग्राहकवर्गात नक्की सहभागी होतील.”

 

देश शाश्वत वाहतुकीच्या दिशेने जात असताना, टीआय सायकल्स कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या दृष्टीने बाइक वापराचे समर्थन करते. इलेक्ट्रिक सायकलमुळे वापरकर्ता मॅन्युअल सायकलच्या तुलनेत स्वत:ला फार न थकवता मोठे अंतर कापू शकतो आणि त्याचे कार्बन उत्सर्जनातील योगदानही कमी राहते. एक किफायतशीर पर्याय उपलब्ध करून देऊन मोंत्रा ई-बायसिकल तरुणाईला भविष्यकालीन वाहतूक व्यवस्थेचा भाग होण्यास प्रोत्साहन देत आहे. मोंत्रा ई-बायसिकल्स आमच्या भारतभरातील डीलर नेटवर्कमध्ये उपलब्ध आहेत.

 

पाहा व्हि़डीओ:


Tags: tia montra-bicyclesटीआय सायकल्सट्युब इन्व्हेस्टमेंट्स ऑफ इंडियामोंत्रा ई-बायसिकल
Previous Post

फेसबुक देणार छोट्या व्यावसायिकांना ५० लाख रुपयांपर्यंत कर्ज!

Next Post

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या १७४ जागांसाठी भरती

Next Post
indian air force

भारतीय हवाई दलात ग्रुप ‘सी’ पदांच्या १७४ जागांसाठी भरती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!