मुक्तपीठ टीम
खासगी क्षेत्रातील या तीन बॅंकामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक चांगली बातमी आहे. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि भारतीय रिझर्व्ह बॅंक या तीन खासगी क्षेत्रातील बँकांनी त्यांचे सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जुलै-सप्टेंबर या तिमाहीत तिन्ही बँकांनी जबरदस्त नफा झाला आहे.
भारतीय रिझर्व्ह बॅंकेला कशाप्रकारे नफा झाला?
. चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा अनेक पटींनी वाढून २०२ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
. बँकेने स्टॉक एक्स्चेंजला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, वर्षभरापूर्वी याच तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा ३१ कोटी रुपये होता.
. जुलै-सप्टेंबर २०२२ या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून २,७५८.९८ कोटी झाले, जे मागील वर्षीच्या तिमाहीत २,५६७.६५ कोटी होते.
. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचा निव्वळ एनपीए देखील २.१४ टक्क्यांवरून १.२६ टक्क्यांवर आला आहे.
आयसीआयसीआयचा जबबरदस्त नफा.. कसा आणि किती जाणून घ्या सविस्तर!
- आयसीआयसीआय बॅंकेच्या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा ३१.४३ टक्क्यांनी वाढून ८,००६.९९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- या तिमाहीत बँकेचा स्वतंत्र आधारावर निव्वळ नफा ३७.१४ टक्क्यांनी वाढून ७,५५७.८४ कोटी रुपये झाला आहे.
- मागील वर्षीच्या याच कालावधीत ते ५,५१०.९५ कोटी रुपये होते.
- या तिमाहीत बँकेचे एकूण उत्पन्न वाढून ३१,०८८ कोटी रुपये झाले आहे.
- यासह, त्याचा एकूण खर्चही वर्षभरापूर्वी १८,०२७ कोटी रुपयांवरून १९,४०८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.
- या कालावधीत बँकेच्या बुडीत कर्जासाठीची आर्थिक तरतूद एका वर्षापूर्वीच्या ७,७१३.४८ कोटी रुपयांवरून १,६४४.५२ कोटी रुपयांवर घसरली आहे.
- तेच, जून तिमाहीत तो १,१४३.८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त राहिला.
कोटक महिंद्रा बँकेला झालेला आर्थिक लाभ…
- चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा जवळपास २७ टक्क्यांनी वाढून रु. २,५८१ कोटी झाला आहे.
- मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीला २,०३२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.
- बँकेने सांगितले की, “जुलै-सप्टेंबर दरम्यान त्यांचे एकूण उत्पन्न १०,०४७ कोटी रुपयांवर पोहोचले आहे जे मागील वर्षी ८,४०८ कोटी रुपये होते.”
- त्याच वेळी, बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न ४,०२१ कोटी रुपयांवरून २७ टक्क्यांनी वाढून ५,०९९ कोटी रुपये झाले आहे.
- तिमाहीत त्याचे निव्वळ व्याज मार्जिन ५.१७ टक्के होते.