Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आरोग्य परीक्षेच्या प्रत्येक केंद्रावर असणार निरीक्षक

आयुक्त एन. रामास्वामींनी व्हिसीद्वारे घेतला पदभरती परीक्षेच्या तयारीचा आढावा

October 19, 2021
in करिअर, घडलं-बिघडलं
0
mantraly

मुक्तपीठ टीम 

राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. आरोग्य सेवा आयुक्त एन. रामास्वामी यांनी याबाबत संबंधित उपसंचालक यांना कार्यवाही करण्यासाठी सूचना दिल्या आहेत.

आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पद भरतीसाठी येत्या रविवारी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या तयारीबाबत आयुक्त एन. रामास्वामी यांनी काल व्ह‍िडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला. अतिरिक्त अभियान संचालक डॉ. सतीश पवार, आरोग्य सेवा संचालक डॉ. अर्चना पाटील यांच्यासह राज्यातील आरोग्य विभागाचे सर्व उपसंचालक, सह संचालक, जिल्हा शल्य चिकित्सक आणि परीक्षेची संबंधित अधिकारी आणि न्यासा कंपनीचे प्रतिनिधी सहभागी झाले होते.

 

 परीक्षा केंद्र परिसरात सुरक्षा

श्री. एन. रामास्वामी यांनी प्रत्येक परीक्षा केंद्रावर आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी. अशी नियुक्ती करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची यादी पाठवावी. प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि उत्तरपत्रिका ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी करावी. परीक्षा केंद्र परिसरात १४४ कलम लागू करण्यासाठी जिल्हा प्रशासनासाठी समन्वय ठेवून आवश्यक ती कार्यवाही करावी, अशा सूचना दिल्या.

 

कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी

जिल्हा शल्य चिकित्सक, उपसंचालक यांनी शाळेतील परीक्षा केंद्राची पाहणी करावी. परीक्षा घेताना कोरोना विषयक नियमांची अंमलबजावणी होण्यासाठी काळजी घ्यावी, अशाही सूचना श्री. रामास्वामी यांनी दिल्या.

 

आसन व्यवस्था, सुरक्षा पाहणी होणार

 रिक्त अभियान संचालक सतीश पवार यांनी परीक्षा केंद्र म्हणून निश्चित केलेल्या शाळांना उपसंचालक, सहसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सक यांनी भेट द्यावी. शाळांतील आसन व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षा याबाबत तयारी करुन घ्यावी, अशा सूचना दिल्या आहेत.

 

दिव्यांग उमेदवारांना सोयी मिळणार

संचालक डॉ. अर्चना पाटील यांनी केंद्र सरकारच्या आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचना नुसार दिव्यांग उमेदवारांना सवलती दिल्या जातील, याबाबत काळजी घ्यावी. परीक्षेसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझर पुरविण्यात यावे, असे सांगितले.


Tags: Commissioner N. RamaswamyDeputy Directordr archana patilsatish pawarआयुक्त एन. रामास्वामीउपसंचालकडॉ. अर्चना पाटीलसतीश पवार
Previous Post

उत्तर प्रदेशात सपासाठी भाजपा, बसपा आमदारांचं क्रॉसवोटिंग! सपाला १३ जास्त मते!

Next Post

सिंघू बॉर्डर खून प्रकरणाला वेगळं वळण! एका निहंग जत्थेदार प्रमुखांचे केंद्रीय कृषिमंत्री तोमरांसोबत छायाचित्र!

Next Post
narendra singh tomar

सिंघू बॉर्डर खून प्रकरणाला वेगळं वळण! एका निहंग जत्थेदार प्रमुखांचे केंद्रीय कृषिमंत्री तोमरांसोबत छायाचित्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!