Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिंघू बॉर्डर खून प्रकरणाला वेगळं वळण! एका निहंग जत्थेदार प्रमुखांचे केंद्रीय कृषिमंत्री तोमरांसोबत छायाचित्र!

शेतकरी नेत्यांचा भाजपावरच आंदोलन संपवण्यासाठी कटाचा आरोप

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
narendra singh tomar

मुक्तपीठ टीम

सिंघू बॉर्डरवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणी लखबीर सिंग या तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. अमानुष हत्या करुन त्या तरुणाचा मृतदेह पोलिसांच्या बॅरिकेटवर लटकवण्यात आला होता. या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली असताना आता या प्रकरणाला वेगळं वळण आलं आहे. काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर सिंह सिंघू सीमेवर बसलेल्या निहंग जथेबंदींच्या प्रमुखांपैकी एक असलेल्या बाबा अमन सिंह यांचा सिरोपा घालून सन्मान करत आहेत. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि इतर भाजपा नेतेही फोटोमध्ये दिसत आहेत. त्यामुळे आता भाजपाच्या आक्रमक भूमिकेमुळे बचावात्मक पावित्र्यात गेलेले शेतकरी नेते आक्रमक झाले आहेत.

 

‘Baba Aman Singh is head of the Nihang group that killed a man at the Singhu border. 4 Nihangs of this group have been arrested. He has been spotted in photos with national BJP leaders, including Union Agriculture Minister NS Tomar’
Important report 👇https://t.co/0hiIrgisOa

— Neha Dixit (@nehadixit123) October 19, 2021

 

शेतकरी नेत्यांचा हत्येमागे कट असल्याचा आरोप

  • फोटो समोर आल्यानंतर संयुक्त किसान मोर्चाने लखबीर सिंग यांच्या हत्येमागे कट असल्याचे सांगत भाजपवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • भाजपा नेत्यांसोबत निहंग बाबा अमन सिंह यांचे ३ फोटो समोर आले आहेत.
  • हे फोटो जुलै २०२१ मधील आहेत.
  • केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांच्या घरी काढलेल्या या फोटोंमध्ये बाबा अमन सिंहसह अनेक भाजपाननेते दिसत आहेत.
  • त्यात केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर,कैलाश चौधरी, लुधियानाचे भाजपा किसान सेलचे राष्ट्रीय सचिव सुखमिंदरपाल सिंह ग्रेवाल,पंजाब पोलिसातून काढून टाकण्यात आलेले इन्स्पेक्टर गुरमीत सिंग ‘पिंकी’ आणि इतर काही जण दिसत आहेत.
  • एका फोटोमध्ये नरेंद्र सिंह तोमर यांनी बाबा अमन सिंग यांना सिरोपा घातला आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये बाबा अमन सिंह केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्यांसोबत जेवणाच्या टेबलावर बसून जेवत आहेत.

 

Union Agriculture Minister NS Tomar with head of a Nihang sect in possible efforts to negotiate end of farmers’ stir, says this news report.
What is pretty interesting is the presence of murder convict Gurmeet Singh ‘Pinky’, an informer turned cop who was dismissed from service. pic.twitter.com/bqzDX14pXd

— Man Aman Singh Chhina (@manaman_chhina) October 19, 2021

 

किसान मोर्चाने फोटो ट्वीट केला

  • मंगळवारी संयुक्त किसान मोर्चाने केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर आणि निहंग बाबा अमन सिंह यांचे फोटो ट्वीट केले.
  • उल्लेखनीय आहे की सिंघू सीमेवर लखबीर सिंहच्या हत्येच्या आरोपावर ज्या चार निहंगा सरबजीत सिंह, नारायण सिंह, भगवंत सिंग आणि गोविंदप्रीतने शरणागती केले, ते चारही बाबा अमन सिंग सोबतचे आहेत.
  • सरबजीत सिंह, भगवंत सिंग आणि गोविंदप्रीत यांच्या शरणागती दरम्यान बाबा अमन सिंह स्वतः पुढे होते.

Tags: narendra singh tomarकिसान मोर्चाकृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमरसंयुक्त किसान मोर्चाने लखबीर सिंगसिंघू बॉर्डर
Previous Post

आरोग्य परीक्षेच्या प्रत्येक केंद्रावर असणार निरीक्षक

Next Post

काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, माध्यम संपर्कासाठी अतुल लोंढे, सोबत सचिन सावंत आणि झाकिर अहमद!

Next Post
congress

काँग्रेसमध्ये जबाबदाऱ्यांचे वाटप, माध्यम संपर्कासाठी अतुल लोंढे, सोबत सचिन सावंत आणि झाकिर अहमद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!