Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

असं असावं फास्ट ट्रॅक कोर्ट! एका दिवसात साक्ष, युक्तिवाद, सुनावणी संपवून नराधमाला जन्मठेप देणारा निकालही!

September 6, 2026
in कायदा-पोलीस
0
Araria Pocso Court

मुक्तपीठ टीम

तारखांवर तारखा…तारखांवर तारखा…आपल्या न्यायालयांबदद्ल नेहमीच असं सांगितलं जातं. न्यायाधीशांची अपुरी संख्या, रोजच वाढते खटले यामुळे न्यायव्यवस्थेवरील दबाव वाढताच असतो. त्यातून मग बलात्कारासारख्या अमानुष गुन्ह्यांसाठी जलदगती न्यायालयांची म्हणजेच फास्ट ट्रॅक कोर्टांची संकल्पना उदयास आली. पण आता या जलदगतींवरील भारही एवढा वाढता आहे की अनेकदा त्यांच्याकडूनही जलद न्याय मिळत नाही, अशा तक्रारी येतात. अशा परिस्थितीत बिहारमधील एका न्यायालयाने एकाच दिवसात साक्ष, वाद-विवाद आणि निकाल सुनावला आहे. पॉक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने ही कामगिरी केली आहे. यामुळे देशासमोर एक नवा आदर्श त्यांनी ठेवला आहे.

अररियाच्या न्यायालयाने एका दिवसात दिला निकाल

  • बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने एका दिवसात निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श ठेवला आहे.
  • पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
  • न्यायालयाच्या या निकालाची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
  • पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे.

 

नेमकं प्रकरण काय?

  • यावर्षी २३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
  • या प्रकरणाच्या तपास अधिकारी रीता कुमारी यांनी आरोपीला अटक करून १८ सप्टेंबर रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
  • या प्रकरणी न्यायाधीश शशिकांत राय यांच्या न्यायालयाने २० सप्टेंबर रोजी दखल घेतली आणि २४ सप्टेंबर रोजी आरोप निश्चित केले.
  • त्यानंतर पॉक्सो न्यायालयाचे विशेष न्यायाधीश शशिकांत राय यांनी त्याच तारखेला एकूण १० साक्षीदारांची साक्ष ऐकून घेतली आणि त्याच दिवशी आरोपी दिलीप यादव याला दोषी ठरवून जन्मठेप आणि ५० हजार दंडाची शिक्षा सुनावली.
  • दरम्यान, न्यायालयाने सरकारला पीडितेला सात लाख रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.

 

न्यायमूर्ती शशिकांत राय यांची कामगिरी

  • नुकताच न्यायाधीश शशिकांत राय यांनी १० वर्षांच्या चिमुरडीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर झालेल्या हत्येप्रकरणी ऐतिहासिक निकाल दिला.
  • या निकालात न्यायालयाने आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली.
  • याआधी ४ ऑक्टोबर रोजी न्यायालयाने ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला दुसऱ्या एका प्रकरणात शेवटच्या श्वासापर्यंत तुरुंगात राहण्याची शिक्षा सुनावली होती.
  • दोन्ही ऐतिहासिक निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश-६ कम पॉक्सो न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी सुनावले आहेत.

Tags: Adv. Shashi Kant RAIAraria Pocso Courtbiharअररिया जिल्हा न्यायालयन्यायाधीश शशिकांत रायपॉक्सो कायदाबिहार
Previous Post

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत डॉक्टर पदांच्या १३९ जागांसाठी भरती

Next Post

एसटी संप: परिवहन मंत्र्यांचा मेस्माखाली कारवाईचा इशारा, तर भाजपाचा आघाडीवर हिटलरशाहीचा आरोप!

Next Post
government warns use of mesma against st strike, bjp reacts

एसटी संप: परिवहन मंत्र्यांचा मेस्माखाली कारवाईचा इशारा, तर भाजपाचा आघाडीवर हिटलरशाहीचा आरोप!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!