Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी गावकरी आणि ट्रेकर्सचं धाडस, दरीत कोसळलेल्या तरुणीचा जीव वाचवला

January 29, 2021
in चांगल्या बातम्या
0
trekking

मुक्तपीठ टीम

 

आंध्र प्रदेश विशाखापट्टणममधील मीना ही तरुणी आपल्या ३ मित्रांसह हैदराबाद येथून राजमाची येथे भटकंतीकरीता आली होती. राजमाची येथील बालेकिल्ला  श्रीवर्धनला भेट दिल्यानंतर, सकाळी तिने आपल्या मित्रांसह गडावरून खाली उतरण्यास सुरुवात केली. वाटेत एक लहान कातळ पॅच उतरत असतांना तोल जाऊन ती घसरली व त्यात तिच्या गुडघ्याला मोठा पीळ बसला. तिला फ्रॅक्चरसारखी इजा झाली. हाडं विस्कळीत झाल्याने होणाऱ्या प्रचंड वेदेनेमुळे तिला चालणे अशक्य झाले होते. श्रीवर्धन किल्ल्यावरून खाली उतरत असलेल्या एका ट्रेकरने ह्या जखमी मुलीची माहिती राजमाचीच्या गावकऱ्यांना दिली. त्यावेळी  येथील ग्रामस्थांना दिली. त्या वेळी राहुल मेश्राम हे त्यांच्या कुटुंबा समवेत उधेवाडी येथेच होते.

 

वन विभाग व ग्राम पंचायत – राजमाची संयुक्त संवर्धन समितीचे प्रतिनिधी गणेश उंबरे यांनी मला ह्या घटनेची माहिती दिली. स्थानिक संघ बचाव कार्यासाठी तयारी करीत होते, त्यात ते देखील सामील झाले. उधेवाडी येथे स्ट्रेचर उपलब्ध नसल्याने काही चादरी हे दोर व बांबूसह घेण्यात आल्या. वरील साहित्य घेऊन ट्रेकर टीम जखमी मुलीकडे पोहोचली. त्यांनी त्वरित बचाव कार्य सुरू केले. प्रमाणित प्रथमोपचार सहाय्यक असल्यामुळे राहुल यांनी त्या जखमी मुलीची वैद्यकीय तपासणी केली. जखमी मुलीचे वजन अधिक असल्यामुळे, तिला किल्ल्यावरून खाली उतरवण्यासाठी, दोरीचा पर्यायी हार्नेस बनवून त्याचं बांबूसह उपयोग करण्याचे आम्ही ठरविले. अश्याप्रकारे त्या मुलीला या पर्यायी स्ट्रेचरच्या व्यवस्थेमध्ये सुखरुप पणे घेऊन ट्रेकर गड उतरू लागले. श्रीवर्धन बालेकिल्ल्याच्या कातळकड्यात खोदलेल्या अरुंद उभ्या पायऱ्या कठीण आहेत. त्या जखमी मुलीला घेऊन उतरताना ट्रेकर टीमला खूप काळजी घ्यावी लागली. दुपारी बचाव टीम त्या मुलीला घेऊन पायथ्याच्या उधेवाडी गावात पोहोचली.

 

उधेवाडीतून सुमो वाहनाने त्या जखमी मुलीला तातडीने जवळच्या लोणावळा शहरातील रुग्णालयात रवाना केले. अशा प्रकारे हे बचाव कार्य आमच्या टीमने यशस्वीपणे पूर्ण केले. हे जलद बचाव कार्य केवळ राजमाची येथील स्थानिक सहासप्रेमी युवकांमुळेच शक्य झाले. ह्या बचाव कार्यात सामील असलेल्या सदस्यांची नावे खालील प्रमाणे आहेत: प्रताप उंबरे, संगम वरे, गणेश उंबरे, अशोक उंबरे, सूरज वरे, विठ्ठल मेंगाळ, श्याम, खंडू वरे, ज्ञानेश्वर उंबरे, तुकाराम उंबरे.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: Andhra PradeshMedical examinationRajmachiShrivardhantrekkersआंध्र प्रदेशकिल्लागडप्रेमीराजमाचीलोणावळावैद्यकीय तपासणीश्रीवर्धन
Previous Post

#चांगलीबातमी बाइकचा अपघात झाला तर जॅकेट-जींसच वाचवणार, तेच बनणार एअर बॅग!

Next Post

#चांगलीबातमी महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नवे करार, ६ हजार ७५४ नव्या रोजगारांची संधी

Next Post
Tourism

#चांगलीबातमी महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नवे करार, ६ हजार ७५४ नव्या रोजगारांची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!