Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

#चांगलीबातमी महाराष्ट्रात पर्यटन क्षेत्रात नवे करार, ६ हजार ७५४ नव्या रोजगारांची संधी

January 27, 2021
in चांगल्या बातम्या
0
Tourism

मुक्तपीठ टीम

 

राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या उपस्थितीत २ हजार ९०५ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले आहेत. यातून राज्याच्या विविध भागात हॉटेल, रिसॉर्ट, वेलनेस सेंटर्स, हेल्थ फार्म, थिम पार्क. मेडीटेशन सेंटर, रोपवे, स्विमींग पूल, हॉटेल स्पा, हेल्थ क्लब, बोटींग आदी विविध पर्यटन सुविधांची निर्मिती होणार असून सुमारे ६ हजार ७५४ रोजगाराची निर्मिती होणार आहे. राज्य शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिला असून यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी करण्यात आली आहे. यापुढील काळातही या क्षेत्राला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण पावले उचलू, असे यावेळी मंत्री श्री. ठाकरे यांनी सांगितले.

 

राष्ट्रीय पर्यटन दिनानिमित्त सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री. ठाकरे, राज्यमंत्री कुमारी तटकरे यांच्यासह पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर सिंह, एमटीडीसीचे व्यवस्थापकीय संचालक आशुतोष सलील, पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर, सहायक संचालक रवींद्र पवार यांच्यासह आदरातिथ्य क्षेत्रातील उद्योजक आदी मान्यवर उपस्थित होते.

 

पर्यटन खात्याशी सामंजस्य करार करणाऱ्या कंपन्या

 

मांडके अँड मांडके ग्रुप (असगोली, ता. गुहागर, जि. रत्नागिरी), महर्षी वेदीक हेल्थ प्रा.लि. (वहनगांव, ता. मावळ, जि. पुणे), मेसर्स शिवाई कृष्णा रोपवेज (सिंहगड, पुणे), हॉटेल नागपूर अशोक (लक्ष्मी नगर, नागपूर), ॲटोमॅटीक होटेल्स अँड रिसॉर्टस् प्रा.लि. (सातपूर, नाशिक), ब्लू शाईन हॉस्पिटॅलिटी (मुनगे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), बीच कॉटेजेस (मोरवे, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), ओशन व्ह्यू रिसॉर्टस् (मुनगे सदेवाडी, ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग), निलकंठ लेइझर एलएलपी (हातगड, ता. सुरगणा, जि. नाशिक), लेक व्ह्यू व्हेन्च्युअर्स (टाकळी सीम, नागपूर), साईओ इन्फ्रा (जावळी, महाबळेश्वर), मेसर्स ट्रायोटा व्हेन्च्युअर्स (चिखलठाणा औद्योगिक क्षेत्र, जि. औरंगाबाद), श्रीश्री इन्फ्रान्स्ट्रक्चर (मेहरुन, जि. जळगाव) या कंपन्यांबरोबर विविध प्रकल्प, आदरतिथ्य उद्योग यांना चालना देण्यासाठी सामंजस्य करार करण्यात आले. या सर्व प्रकल्पांना गतिमान करण्यासाठी तसेच शासनामार्फत दिल्या जाणाऱ्या विविध धोरणे, योजनांचा त्यांना लाभ, सवलती मिळवून देण्यासाठी पर्यटन विभाग आणि पर्यटन संचालनालयामार्फत सर्वतोपरी मदत केली जाणार आहे. हे सर्व प्रकल्प जून २०२२ ते २०२४ पर्यंत पूर्ण होणार आहेत.

 

याशिवाय यावेळी जीवन कदम आणि सौरभ भट्टीकर या व्ह्लॉगर यांच्यासमवेतही पर्यटन संचालनालयाचा सामंजस्य करार करण्यात आला. हे व्ह्लॉगर राज्यातील पर्यटनाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून चालना देणार आहेत. यावेळी मुंबईत २५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजित केलेल्या द मुंबई फेस्टीव्हलची तसेच व्हीडीओग्राफी स्पर्धेचीही घोषणा करण्यात आली.

 

पर्यटन मंत्री श्री. ठाकरे म्हणाले की, शासनाने राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी कृषी पर्यटन धोरण, बीच सॅक धोरण जाहीर केले असून कॅराव्हॅन पर्यटन धोरण लवकरच जाहीर होत आहे. आजच्या सामंजस्य करारातून राज्याच्या सर्वच भागात गुंतवणूक होत आहे. यातून राज्याच्या सर्वच भागात पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्राला मोठी चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.

 

पर्यटन राज्यमंत्री कुमारी आदिती तटकरे म्हणाल्या की, कोरोनोत्तर काळात राज्यात पर्यटनाला मोठा वाव आहे. शासनामार्फत राज्यातील सर्व विभागांमध्ये पर्यटनाला चालना देण्यात येईल. सर्व विभागांमध्ये पर्यटन महोत्सवासारखे उपक्रम राबविण्यात येतील. शासनाने आदरातिथ्य क्षेत्राला उद्योगाचा दर्जा दिल्याने तसेच यासाठी लागणाऱ्या परवान्यांची संख्या कमी केल्याने राज्यात या क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठा वाव आहे. त्यामुळे या क्षेत्रातील उद्योजकांनी पुढे यावे, शासनामार्फत त्यांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: employment opportunitiesMaharashtraNational Tourism DayNew contractstourism sectorपर्यटन क्षेत्रमहाराष्ट्रराष्ट्रीय पर्यटन दिनरोजगार संधी
Previous Post

#चांगलीबातमी गावकरी आणि ट्रेकर्सचं धाडस, दरीत कोसळलेल्या तरुणीचा जीव वाचवला

Next Post

#चांगलीबातमी नाशिक – बेळगाव विमान सेवा, ’स्टार’ची आठवड्यातून तीन वेळा उड्डाणं

Next Post
Airlines

#चांगलीबातमी नाशिक – बेळगाव विमान सेवा, ’स्टार’ची आठवड्यातून तीन वेळा उड्डाणं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!