Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

ठाण्यातील एसटीच्या जागा रुग्णालय आणि वाहन तळासाठी!

परिवहन मंत्री अनिल परब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बैठकीत निर्णयावर शिक्कामोर्तब

April 8, 2022
in सरकारी बातम्या
0
परिवहन मंत्री अनिल परब आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची बैठक 1

मुक्तपीठ टीम

ठाणे  शहरातील कळवा रुग्णालयाजवळील एसटी कार्यशाळेच्या जागेवर पालिकेचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभे करण्यास तसेच ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी स्थानकाची जागा भूमिगत वाहनतळासाठी देण्यास परिवहन विभागाने अखेर मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच या दोन्ही जागा ठाणे महानगरपालिकेला हस्तांतरित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यात मंत्रालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला लागून असलेल्या एसटी कार्यशाळेच्या जागेचा पुनर्विकास करून त्याजागी महापालिकेच्या माध्यमातून सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभारण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे गेली अनेक वर्षे प्रयत्नशील आहेत. त्यासोबतच ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एसटी बस स्थानकाच्या जागेवर भूमिगत वाहनतळ उभारण्यासाठीही ते आग्रही होते. या अनुषंगाने आज पुन्हा बैठक पार पडली. याबाबत यापूर्वी झालेल्या बैठकीत या दोन्ही प्रकल्पांचा सुधारित विकास आराखडा परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासमोर सादर करण्यात आला होता. त्यावेळी या दोन्ही योजनांना जागा देण्यासाठी तत्वतः मंजुरी देताना एसटीची गरज आणि पुरेशी जागा उपलब्ध करून त्यांनतरच हे भूखंड विकसित करायला परवानगी देवू असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार ठाणे महानगरपालिका आणि परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी एकत्र बसून महामंडळाच्या गरजा लक्षात घेऊन त्यानुसार सुधारित आराखडा परिवहन मंत्र्यासमोर सादर केला. यातून परिवहन महामंडळाची गरज आणि ठाणे महानगरपालिकेचे हित दोन्ही साध्य होत असल्याने या प्रकल्पांना जागा देण्यास तयार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ठाणे शहरात संपूर्ण जिल्ह्यातून येणाऱ्या रुग्णांना उत्तम वैद्यकीय सुविधा पुरवणे तसेच रेल्वे स्थानकाकडे येणाऱ्या वाहनांना पुरेसे वाहनतळ उपलब्ध करून देणे या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असल्याने त्यासाठी हे प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे बनले होते. आज परिवहन मंत्र्यांनी या दोन्ही मागण्या मान्य केल्याने हे दोन्ही प्रकल्प लवकरच सुरू करणे शक्य होईल असे मत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केले.

यावेळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्यासह नगरविकास, एसटी आणि ठाणे महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.


Tags: Anil ParabEknath ShindeHospitalsSTthanevehiclesअनिल परबएकनाथ शिंदे
Previous Post

मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा कट! संजय राऊतांचा आरोप!

Next Post

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती देण्यास सीबीआयचा नकार!

Next Post
Sushant Singh Rajput case

सुशांत सिंह राजपूत प्रकरण: तपासाची माहिती देण्यास सीबीआयचा नकार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!