Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोनाचा कहर, थायलंडच्या तरुणीचा मृत्यू, राजकारण रंगलं!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
girl

मुक्तपीठ टीम

 

देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच उत्तर प्रदेशात थायलँडवरून आलेल्या एका युवतीच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. या मृत्यूचा कनेक्शन मुलाशी जोडल्यामुळे भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठ चर्चेत आले आहेत. त्यांनी रविवारी पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांना पत्र लिहून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे सपा नेते आयपी सिंग यांनी ट्विट करून सेठ यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनीही पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून याप्रकरणी एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सेठ सांगतात की, आयपी सिंग आणि इतर काही लोक त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 

या प्रकरणातील वस्तुस्थिती सार्वजनिक करण्यासाठी खासदार सेठ यांनी पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की आयपी अ‍ॅक्ट 2000 नुसार आयपी सिंग (@IPSinghSp), महेंद्र कुडिया (@GaDDastak) यांच्यावर कारवाई केली जावी. तसेच त्याच्या कुटुंबाची बदनामी करणार्‍या सोशल मीडिया हँडल्स आणि अकाउंट्सवर बंदी घालावी.

 

माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आरोप

• दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी एसीएस होम आणि डीजीपी यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.
• त्यात म्हटले आहे की या युवतीला गोपनीयता पाळत थायलँडवरून बोलवले होते.
• ती कोरोनाने आजारी पडल्यावर तिच्यावर बेकायदेशीररीत्या लपवून अयोग्य उपचार करण्यात आले.

समाजवादी पार्टीची सीबीआय चौकशीची मागणी

• समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंग यांनी थायलंडमधील युवतीच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
• युवतीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून, बिल्डर आणि भाजपा खासदार संजय सेठ यांचा मुलगा आहे.
• मी जेव्हा यूपी पोलिसांना टॅग करून चौकशीची मागणी केली तेव्हा खासदार सेठ माझ्यावर आरोप करत धमकी देत आहेत.
• ते म्हणाले की मी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
• उदाहरणार्थ- युवतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले का, मृत्यूचे कारण काय आहे, शिवम कोण आहे, कोणासाठी तो काम करतो आहे, तो पोलीस कोठडीत आहे का?, युवतीचे एजंट सलमान आणि राकेश शर्मा कोठे आहेत, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून युवतीला येथे आणले, ज्या हॉटेलमध्ये मुलगी राहिली होती, त्याचे रेकॉर्डिंग कुठे आहे?
• सिंह म्हणाले की पोलिसांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
• या प्रकरणात मला कोर्टात जावे लागले तर मी जाईन.

 

या गोष्टींचा तपास केला पाहिजेः सेठ

  • मुलीची पार्श्वभूमी, पासपोर्ट क्रमांक, मोबाइल कॉल डिटेस
  • लखनौमध्ये कोठे राहिली? कधी आणि कोणाला भेटली
  • युवतीसाठी लखनौमध्ये हॉटेल कोणी बुक केले
  • हॉटेलमध्ये येणाऱ्या – जाणाऱ्याचे, व्हिजिटर्सचे सीसीटीव्ही फुटेज
  • युवतीला रुग्णालयात कोणी दाखल केले
  • व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये नमूद झालेल्या सलमानच्या गाईडची भूमिका
  • मुलगी देशातील दुसर्‍या शहरात जाऊन इतर लोकांना भेटली का?

Tags: BJPcoronaNCPउत्तर प्रदेशथायलँडनूतन ठाकूरसपा नेते आयपी सिंग
Previous Post

केंद्राकडून महाराष्ट्रातील पंचायतींना ८६१ कोटींचा निधी

Next Post

अलिगड विद्यापीठात महिनाभरात ३४ मृत्यू, कोरोनाचा रहस्यमय प्रकार

Next Post
amu 4

अलिगड विद्यापीठात महिनाभरात ३४ मृत्यू, कोरोनाचा रहस्यमय प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!