मुक्तपीठ टीम
देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे. यातच उत्तर प्रदेशात थायलँडवरून आलेल्या एका युवतीच्या मृत्यूने एकच खळबळ माजली आहे. या मृत्यूचा कनेक्शन मुलाशी जोडल्यामुळे भाजपाचे राज्यसभा खासदार संजय सेठ चर्चेत आले आहेत. त्यांनी रविवारी पोलीस आयुक्त डी.के. ठाकूर यांना पत्र लिहून संपूर्ण घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे. दुसरीकडे सपा नेते आयपी सिंग यांनी ट्विट करून सेठ यांच्या मुलावर गंभीर आरोप केले आहेत. माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनीही पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून याप्रकरणी एफआयआर नोंदविण्याची मागणी केली आहे. या संदर्भात सेठ सांगतात की, आयपी सिंग आणि इतर काही लोक त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
या प्रकरणातील वस्तुस्थिती सार्वजनिक करण्यासाठी खासदार सेठ यांनी पोलिस आयुक्तांकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की आयपी अॅक्ट 2000 नुसार आयपी सिंग (@IPSinghSp), महेंद्र कुडिया (@GaDDastak) यांच्यावर कारवाई केली जावी. तसेच त्याच्या कुटुंबाची बदनामी करणार्या सोशल मीडिया हँडल्स आणि अकाउंट्सवर बंदी घालावी.
माहिती अधिकार कार्यकर्त्यांचे आरोप
• दुसरीकडे माहिती अधिकार कार्यकर्ते नूतन ठाकूर यांनी एसीएस होम आणि डीजीपी यांना या संदर्भात पत्र लिहिले आहे.
• त्यात म्हटले आहे की या युवतीला गोपनीयता पाळत थायलँडवरून बोलवले होते.
• ती कोरोनाने आजारी पडल्यावर तिच्यावर बेकायदेशीररीत्या लपवून अयोग्य उपचार करण्यात आले.
समाजवादी पार्टीची सीबीआय चौकशीची मागणी
• समाजवादी पक्षाचे प्रवक्ते आयपी सिंग यांनी थायलंडमधील युवतीच्या मृत्यूप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
• युवतीच्या मृत्यूप्रकरणी आरोपी हा दुसरा तिसरा कोणी नसून, बिल्डर आणि भाजपा खासदार संजय सेठ यांचा मुलगा आहे.
• मी जेव्हा यूपी पोलिसांना टॅग करून चौकशीची मागणी केली तेव्हा खासदार सेठ माझ्यावर आरोप करत धमकी देत आहेत.
• ते म्हणाले की मी पोलिसांना अनेक प्रश्न विचारले आहेत.
• उदाहरणार्थ- युवतीच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम केले का, मृत्यूचे कारण काय आहे, शिवम कोण आहे, कोणासाठी तो काम करतो आहे, तो पोलीस कोठडीत आहे का?, युवतीचे एजंट सलमान आणि राकेश शर्मा कोठे आहेत, त्यांनी कोणाच्या सांगण्यावरून युवतीला येथे आणले, ज्या हॉटेलमध्ये मुलगी राहिली होती, त्याचे रेकॉर्डिंग कुठे आहे?
• सिंह म्हणाले की पोलिसांनी माझ्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत.
• या प्रकरणात मला कोर्टात जावे लागले तर मी जाईन.
या गोष्टींचा तपास केला पाहिजेः सेठ
- मुलीची पार्श्वभूमी, पासपोर्ट क्रमांक, मोबाइल कॉल डिटेस
- लखनौमध्ये कोठे राहिली? कधी आणि कोणाला भेटली
- युवतीसाठी लखनौमध्ये हॉटेल कोणी बुक केले
- हॉटेलमध्ये येणाऱ्या – जाणाऱ्याचे, व्हिजिटर्सचे सीसीटीव्ही फुटेज
- युवतीला रुग्णालयात कोणी दाखल केले
- व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये नमूद झालेल्या सलमानच्या गाईडची भूमिका
- मुलगी देशातील दुसर्या शहरात जाऊन इतर लोकांना भेटली का?