Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“तिघांचे सरकार, चर्चा करुन मार्ग काढणार”

January 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
ajit pwar

महाविकास आघाडी हा शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचे सरकार आहे. किमान समान कार्यक्रम आम्ही तिघांनी ठरवला आहे. त्यामुळे तिघांचे सरकार चालवत असताना काही विषय कधीही निघू शकतात. याबाबत एकत्र बसून चर्चा करून योग्यपद्धतीने मार्ग काढू असे सांगतानाच यासंदर्भात आज आमची बैठक आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना दिली.

 

दरम्यान, या विषयावर मी बोलणार आहे. नक्की यात काय झाले आहे. जाणीवपूर्वक गडबड केली का याबाबी तपासू आणि यातून आम्ही एकत्र मार्ग काढू. कधी कधी अशाप्रकारच्या गोष्टी घडतात. यामागचे नक्की कारण काय आहे आणि नक्की काय झालं हे विचारून आणि शहानिशा करून वक्तव्य करेन असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

आरे कारशेडबाबत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातलं होतं. मुंबईतील हिरव्यागार परिसरात आरे कारशेड करणे उद्धव ठाकरेंना पूर्वीपासून मान्य नव्हतं. मग कांजूरमार्गचा पर्याय समोर आला. आता काहीजण म्हणतात ती जागा केंद्रसरकारची आहे, एक जण म्हणतो माझी आहे. राज्याचे अधिकारी म्हणतात राज्याची आहे असे काही ना काही सुरू आहे. मुख्यमंत्री यात स्वतः लक्ष देतायत, ते मार्ग काढतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

प्रिमियम निर्णयावर विरोधकांना जाणीवपूर्वक तशी टीका करायची आहे. त्यांना दुसरं काम नाही असा टोला लगावतानाच मुद्रांक शुल्काबाबत निर्णय घेतला तेव्हाही विरोधकांनी टीका केली होती. तो निर्णय झाल्यानंतर मोठ्याप्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाले. याचा फायदा सर्वांना झाला. ग्राहकांना शून्य टक्के मुद्रांक शुल्क आकारले गेले. तीन टक्के आम्ही सोसले. दोन टक्के बिल्डरांनी सोसले. म्हणजे सदनिका घेणाऱ्यांचा पाच टक्के फायदा झाला. प्रिमियमचा निर्णय घेतानाही सरकारने ग्राहक हित लक्षात घेतले आहे. एसआरएचे अनेक प्रकल्प ठप्प आहेत. यातून प्रकल्पाच्या किंमती वाढत होत्या.

 

त्यामुळे हा निर्णय घेताना याचा निर्णय सर्वसामान्य ग्राहकांनाच होईल. तशा अटी आम्ही घातल्या आहेत. राज्यातील ४ प्रमुख महापालिकेतील आयुक्तांनीही हा निर्णय करावा अशी विनंती केली होती. कोरोनाच्या काळात बांधकाम व्यवसाय ठप्प झालाय, कुणाला काम मिळत नव्हतं, त्याला उभारी येण्यासाठी हे केलं आहे. अतिशय विचारपूर्वक हा निर्णय केलेला आहे असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

 

केंद्राकडून अतिवृष्टी अवकाळीसाठी अजून मदत आलेली नाही. अतिवृष्टीतील मदतीसाठी १० हजार कोटीचे पॅकेज सरकारने जाहीर केले होते. त्यातील २ हजार कोटी द्यायचे राहिले होते, ते आजच दिल्याचे सांगतानाच ही रक्कम कर्ज काढून दिली आहे. त्यामुळे आधीच्या निधीचे वितरण झाल्यानंतर आम्ही पुढील रक्कम दिली. अन्यथा व्याजाचा भुर्दंड पडतो, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

केंद्राकडे जीएसटीची कालपर्यंतची थकबाकी २६ हजार कोटीची आहे. मात्र दर आठवड्याला आता पैसे यायला लागले आहेत असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.

 

ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य कुठल्या पक्षाचे आहेत हे कधी कळत नाही. कारण तिथं कुठल्याच पक्षाचे चिन्ह नसते. जे निवडून येतात ते सांगतात आम्ही तुमच्याच पक्षाचे आणि काम करून घेतात असे सांगतानाच मी ३० वर्ष ग्रामपंचायतीच्या निवडणुका पाहत आलोय. आमच्या इथेही दोन गट उभे राहतात. जे निवडून येतात ते आम्हाला येऊन भेटतात आणि म्हणतात आम्ही साहेबांचेच अशी कोपरखळीही अजित पवार यांनी केली.

 

कृषी विभागाकडून ईडीने कागदपत्रे मागवली आहेत याबाबत पत्रकारांनी विचारलं असता एखाद्या चौकशी करणार्‍या संस्थेने कुठल्या काळातील कागदपत्रे मागवावीत हा त्यांचा अधिकार आहे. त्यांनी कागदपत्रे मागितली तर ती सादर करणे संबंधितांचे काम आहे. मी याबाबत कृषीमंत्र्यांशी बोलणार होतो, पण त्यांना कोरोना झाला आहे. असं काही झालं आहे का याबाबत आज मी संबंधित सचिवांकडून माहिती घेणार आहे असल्याचे त्यांनी सांगितले.

 

मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी स्वबळावर जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता राष्ट्रवादीची भूमिका मित्रपक्षांबरोबर आघाडी करून पुढे जायचं अशी चर्चा सुरू आहे.

 

अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार पवारसाहेबांना आहे. आघाडी करावी, मतांची विभागणी होऊ नये या मताचा मी आहे. परंतु आघाडी न केल्यास ना तुला ना मला ना तिसऱ्याला असं होऊ शकतं. त्यामुळे आघाडीबाबत मी सकारात्मक आहे. आम्ही याबाबत बाळासाहेब थोरातांशी व भाई जगताप यांच्याशी चर्चा करू. महाविकास आघाडीला कुठे अडचण न येता स्थानिक स्वराज्य संस्थेच यश मिळावे असा आमचा प्रयत्न असेल असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

 

 

विधानपरिषद निवडणुकीत गडबड झाल्याचा चंद्रकांत पाटील यांच्या आरोपाबाबत बोलताना याची चौकशी करा, आमचं काहीही म्हणणं नाही. पराभव झाला की अशा गोष्टी पुढे आणल्या जातात. लोकसभा निवडणुकीचा निकाल आला तेव्हाही यात निकाल मॅनेज केला असं बोललं जायचं पण असं होत नाही असेही अजित पवार म्हणाले.

 

 

औरंगाबाद नामकरणाविषयी बोलताना महाविकास आघाडी याबाबत एकत्र बसून चर्चा करून मार्ग काढेल असे सांगितले. दरम्यान प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मागणीवर बोलताना कुणी काय मागणी करावी हा ज्याचा त्याचा अधिकार आहे. कुणी भावनिक मुद्दे काढले, कुणी विकासाबद्दल बोलते, कुणी नामकरणाबद्दल बोलतं. राज्याच्या ६० वर्षाच्या इतिहासात अशा अनेक गोष्टी झाल्या. कोण औरंगाबादबद्दल बोलते, कोण नगरबद्दल बोलते आता पुण्याबद्दलही बोलतायत, बातम्या येत आहेत, त्यामुळे आता आणखी कुणाला काय काय सुचायला लागलंय. मागणी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. आपण अनेक विमानतळांना मान्यवरांची नांवे दिलेली पाहिली आहेत. उत्तर प्रदेशात मायावती निवडून आल्यानंतर त्यांनी अनेक जिल्ह्यांची, शहरांची नांवे बदलून टाकली. लोकशाहीत जे निवडून येतात त्यांना बहुमताच्या जोरावर काही अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर कसा करावा हा ज्याने त्याने आत्मचिंतन करून निर्णय घ्यावा. काहींचे मुद्दे बरेच वर्ष डोक्यात होते. त्यावेळी ते पुढे रेटता आले नाही. आता त्यांना वाटतंय हा प्रश्न सुटावा.  पण हा प्रश्न सुटत असताना महाविकास आघाडी टिकावी अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. योग्य तो मार्ग निघावा. विकास कामांना महत्त्व द्यावं, ही भूमिका शरद पवारांची आहे. आम्हीही याच भूमिकेचे समर्थन करून पुढे जात आहोत असे अजित पवार यांनी सांगितले.

 


Tags: ajit pawarCongressMVANCPshiv sena partryअजित पवारमहाविकास आघाडी
Previous Post

साडेचार लाख रुपयांच्या गुटख्यासह तरुणाला अटक

Next Post

राष्ट्रगीताच्यावेळी डोळ्यात अश्रू…मोहम्मद सिराजने काय सांगितले?

Next Post
Mohmmed Siraj Tears

राष्ट्रगीताच्यावेळी डोळ्यात अश्रू...मोहम्मद सिराजने काय सांगितले?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!