Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझरची आत्महत्येने खळबळ

विद्याविहार रेल्वे स्थानकातील कार्यालयात गळफास घेतला

January 7, 2021
in कायदा-पोलीस
0
railway chief booking supervisor suicide

Silhouette depressed man want to commit suicide by hanging rope


रेल्वेच्या चीफ बुकींग सुपरवायझर कैलास कदम यांनी गुरुवारी सकाळी विद्याविहार रेल्वे स्थानकातील आपल्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने रेल्वे अधिकारी आणि कर्मचार्‍यांमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांच्याकडे पोलिसांना सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. याप्रकरणी घाटकोपर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपासाला सुरुवात केली आहे.

 

५५ वर्षांचे कैलास कदम हे मध्य रेल्वेमध्ये चीफ बुकींग सुपरवायझर म्हणून कार्यरत होते. सध्या त्यांची नेमणूक विद्याविहार रेल्वे स्थानकात होती. गुरुवारी सकाळी नऊ वाजता ते नेहमीप्रमाणे कामावर हजर झाले. चहा घेतल्यानंतर ते केबीनमध्ये काम करीत होते, अचानक त्यांनी आतून कडी लावली, त्यानंतर त्यांनी तिथेच गळफास लावून आत्महत्या केली होती, बराच वेळ होऊन कैलास कदम हे केबीनबाहेर आले नाही, त्यामुळे त्यांचा एक सहकारी तिथे गेला होता, यावेळी त्याला कैलास यांनी कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यानंतर त्याने ही माहिती रेल्वे पोलिसांना दिली. ही माहिती मिळताच रेल्वे वरिष्ठ अधिकार्‍यांसह घाटकोपर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती, त्यांना तातडीने जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

 

प्राथमिक तपासात कैलास कदम हे कल्याण येथे पत्नी आणि दोन मुलींसोबत राहत होते. गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावात होते, मात्र त्यांना कुठले तणाव होते याचा उलघडा होऊ शकला नाही, त्यांच्याकडे सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे त्यांनी आत्महत्या का केली याचा खुलासा होऊ शकला नाही. त्यांच्या आत्महत्येची माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना कळविण्यात आली होती, लवकरच त्यांच्या पत्नीसह इतर नातेवाईकांची पोलिसांकडून जबानी नोंदवून घेतली जाणार आहे. या जबानीनंतर त्यांच्या आत्महत्येमागील कारणाचा उलघडा होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.


Tags: railway chief booking supervisorsuicideआत्महत्यारेल्वे चीफ बुकींग सुपरवायझर
Previous Post

राष्ट्रगीताच्यावेळी डोळ्यात अश्रू…मोहम्मद सिराजने काय सांगितले?

Next Post

सावधान! सरकारच्या अधिकृत कोरोना अ‍ॅपआधीच फेक अ‍ॅपचा संसर्ग!

Next Post
Co-win App

सावधान! सरकारच्या अधिकृत कोरोना अ‍ॅपआधीच फेक अ‍ॅपचा संसर्ग!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!