मुक्तपीठ टीम
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना गुरुवारपासून सिडनी येथे खेळला जात आहे. सामन्यात राष्ट्रगीतादरम्यान भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज भावूक झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले. त्याचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला. अखेर त्याने सायंकाळी अश्रूंचे कारण स्पष्ट केले.
टॉस जिंकल्यानंतर मोहम्मद सिराजने प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का दिला. त्याने अनुभवी ओपनर डेव्हिड वॉर्नरला ५ धावांनंतर पॅव्हेलियनवर पाठवले. त्याच मालिकेच्या दुसर्या कसोटी सामन्यात सिराजने पदार्पण केले. पदार्पण कसोटीत त्याने ५ विकेट्स घेतल्या. सिडनी सामना सिराजच्या कारकीर्दीतील दुसरा सामना आहे.
सिराज वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाऊ शकला नव्हता
आयपीएलच्या 13 व्या सत्रात सिराज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला होता. तेथून ते थेट ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेले होते. याच काळात त्याचे वडील मोहम्मद गौस (वय 53) यांचे हैदराबादमध्ये निधन झाले.
ते बराच काळ फुफ्फुसांच्या आजाराशी झुंज देत होते. ऑस्ट्रेलियातील क्वारंटाईन कालावधीमुळे सिराज वडिलांच्या अंत्यविधीला जाऊ शकला नाही. यानंतरही तो भारतात परतला नाही आणि तो संघात कायम राहिला.
आपल्या डोळ्यातील अश्रूंबद्दल नंतर सिराजने माहिती दिली. तो म्हणाला माझ्या वडिलांचे निधन झाले तरी मी जाऊ शकलो नव्हतो. मी भारतासाठी कसोटी खेळावी हे त्यांचे स्वप्न होते. ते पूर्ण झाले.
जाफरना आठवला धोणी
दरम्यान, माजी भारतीय ओपनर वासीम जाफर यांनी महेंद्रसिंग धोनीच्या आठवणींना उजाळा दिला. वसीम जाफर सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाले- मैदानावर चाहते कमी असले किंवा नसले तरी भारताकडून खेळणे यापेक्षा मोठी प्ररेणा असू शकत नाही.
महेंद्रसिंग धोनी म्हणाले होते की,”तुम्ही चाहत्यांसाठी नव्हे तर देशासाठी खेळता.”
२०११ च्या विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवानंतर धोनीने माध्यमांना हेच सांगितले. २०११ चे विजेतेपद भारतीय संघानेच जिंकले होते. त्याने अंतिम सामन्यात श्रीलंकेला पराभूत केले होते.