मुक्तपीठ टीम
एकापाठोपाठ एक दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेल्याने महाराष्ट्राचे शिंदे-फडणवीस सरकार सध्या विरोधकांच्या निशाण्यावर आहे. नागपुरात नुकताच ठरलेला टाटा-एअरबस प्रकल्पही महाराष्ट्र सरकारच्या हातातून निसटून गुजरातमधील वडोदरा येथे गेला. या घटनेनंतर नागपूरचे भाजप खासदार आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांना पत्र लिहिल्याची चर्चा होती. नागपुरातील गुंतवणुकीबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राला टाटा समूहाने सकारात्मक उत्तर दिले आहे.
नितीन गडकरींच्या पत्राला उत्तर देण्यासाठी लिहिलेल्या पत्रात ‘आम्ही पाठिंबा देण्यास तयार आहोत’, असे टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी म्हटलं आहे.
गडकरींच्या पत्राला एन. चंद्रशेखरन यांचे उत्तर!
- गडकरींच्या पत्रानंतर टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन यांनी १९ ऑक्टोबरला उत्तर दिलं आहे.
- त्यांनी म्हटले आहे की, आमची टीम विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कॉन्सिलच्या संपर्कात आहे.
- आम्ही नवीन गुंतवणुकीच्या संधींचे मूल्यांकन करत आहोत.
महाराष्ट्र आणि गुजरात वाद गुंतवणूक!
- सध्या महाराष्ट्रातून गुजरातला दोन मेगा प्रकल्पांचे हस्तांतरण झाले आहे. तेव्हापासून राजकीय गोंधळ सुरूच आहे.
- नितीन गडकरी यांनी टाटा सन्सचे चेअरमन एन चंद्रशेखरन यांना ७ ऑक्टोबर रोजी पत्र लिहून गुंतवणुकीचे आवाहन केले होते.
- त्यात त्यांनी पोलाद, वाहन, ग्राहक उत्पादने, आयटी सेवा आणि विमान वाहतूक यासारख्या व्यवसायात काम करणाऱ्या कंपन्या नागपुरात गुंतवणूक करू शकतात.
- उद्योगांसाठी नागपुरात जमिनीची कमतरता नाही असे लिहिले आहे.